पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२३

हौदाचें झाकण स्क्रू मारून गच्च बंद केलेले असते व त्यांतून पातळ साबू शोषकपंपानें क हौदांत नेण्यास ब व क हौदास नळ जोडलेला असतो. इतकाच फेरफार करावा लागतो.

१ ल्या रीतीच्या दुसऱ्या प्रकारानें काम करण्याची माहिती-

याप्रकारानें काम करण्यांतही स्निग्ध पदार्थावर ५ क्रिया कराव्या लागतात.

१ ली क्रिया - ४ शेर ताजा चुना ४० शेर पाण्यांत विरघळवून

मिश्रण अ हौदांत ठेवावें. नंतर १०० शेर स्निग्ध पदार्थ ब हौदांत टाकावा. नं- तर तें चुन्याचें पाणी सर्व चुन्यासह व हौदांतील स्निग्ध पदार्थात मिळवावें. शिजतांना या मिश्रणाच्या दर चौरस इंचावर ५६ पौंडांचा दाब पडेल, इतकें त्या ब हौदांचें झांकण गच्च बंद करावें; व उष्णता द्यावी नंतर पहिल्या क्रियेप्रमाणेंच तें मिश्रण वारंवार ढवळून वाफेने किंवा विस्तबानें चार तास शिजविलें म्हणजे चुन्याचा साबू तयार होतो. तो शिजल्याची मागील प्रकारांत सांगितल्याप्रमाणें परीक्षा करून, पूर्ण शिज- . ल्यानंतर उष्णता बंद करावी. नंतर तो सर्व पातळ साबू हवेच्या किंवा वाफेच्या दाबानें खालच्या नळीवाटें उडवून क हौदांत आणावा व तेथे स्थीर ठेवावा.

२ री क्रिया पातळ साबू स्थिर झाल्यावर खालचें ग्लिसराईनयुक्त

पाणी निराळें काढून ठेवावें. A

३री किया ५३ शेर सल्फ्युरिक आसिड २१ शेर पाण्यांत.

मिळवून तें थंड झाल्यावर त्या साबूंत मिळवावें. व तीन तास ढवळून शिजवावें. -

४ थी व ५ वी क्रिया - पुढे स्निग्ध आसिडें निराळी काढून

वड्या पाडून त्यांजवर थंडा व गरम दाब करण्याच्या किया ( ४ थी व ५ वी ) पहिल्या प्रकाराप्रमाणेंच करून स्टिअरीक आसीड तयार करावें.