पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२४

तिसरा प्रकार.

१ ल्या रीतीच्या तिसव्या प्रकारानें काम करण्याची माहिती

• दुसऱ्या प्रकारांत मिश्रण शिजवितांना त्याजवर जास्त दाब केल्यानें चुन्याचें प्रमाण दर शेकडा १६ चें ४ भागावर आले हे तत्व समजलें. पुढें याहीपेक्षा जास्त दाब देऊन शिजवितांना चुन्याचें प्रमाण कमी ★ करण्याची युक्ति सांपडली. याच युक्तीप्रमाणे हल्लीं इंग्लंड देशांत पुष्कळ कारखानदार स्टिअरींक आसीड तयार करितात.

भांडीं वगैरे सामान बहुतेक मागील प्रमाणेच असतें. फक्त व

हौदांत मिश्रण घालण्यास व काढण्यास कॉकसहित नळ्या लागू करून तो जाड पत्र्यांचा मजबूत व त्याचें झांकण अधिक गच्च करण्यास त्यास जोरदार स्क्रू मारलेले असा तयार करावा. मिश्रण शिजतांना त्यावर जास्त दाब दिल्यानें तें भांडें फुटण्याचा संभव असतो म्हणून वरील मजबुती करावी लागते. कोणी या काम उभे पेपीन डिजेस्टर म्हणजे उभें लोखंडी पंचपात्र ( नळ्या कॉक व बंद झांकणासहित ) तयार मिळतें त्याचा उपयोग करतात. भांडी वगैरे सामानांत एवढा फेरफार करावा लागतो. जास्त दाब म्हणजे जास्त उष्णता द्यावी लागते. पहिल्या रीतीच्या तिसऱ्या प्रकारानें काम करण्याची माहिती. १ ली क्रिया - वरील कोणतेंही मिश्रणाचा स्निग्ध पदार्थ १०० शेर व हौदांत किंवा उभ्या पेपीन डिजेस्टर नामक पंचपात्रांत नळी वाटें सोडावा. ताजा भाजलेला कळीचा चुना दोन शेर घेऊन ५० शेर गोड्या पाण्यात विरघळवावा. ते सर्व मिश्रण नळीवाटे सोडून ब हौदांतील किंवा पेपीन डिजेस्टरांतील स्निग्ध पदार्थात मिळवावें, नंतर वारंवार ढवळून ढवळून वाफेची किंवा विस्तवाची उष्णता देऊन चार तास तें मिश्रण शिजवावें. व तें मिश्रण शिजतांना त्याच्या दर चौरस A