पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२६

काढून घ्यावें. स्टिअरीक आसीड व ओलिईक आसीड यांच्या किमती अनुक्रमे ३ व २ या प्रमाणानें बाजारांत असतात. ह्मणून फार खबर दारी घेऊन दोन्ही स्निग्ध आसिडें निरनिराळी करावी ह्मणजे नुकसान होण्याचा संभव नसतो.

दुसऱ्या क्रियेनें काढलेले ग्लिसराईनयुक्त पाणी एका मोठ्या भांड्यांत

सांठवून ठेवावें. त्यापासून स्वच्छ ग्लिसराईन तयार करण्याची माहिती पुढें स्वतंत्र भागांत देण्यांत येईल.

याप्रमाणे वरील तीनही प्रकारांनीं मेणबत्त्यांचें द्रव्य जे स्टिअरिक

आसीड तें तयार करतांना जर चरबी व ताडाचें तेल हा मूळ निग्ध पदार्थ वापरला असेल तर त्याच्या १०० भागापासून पांढरें व कठिण स्टिअरीक आसीड ५०-५५ भाग तयार होतें. पण वरच्या स्निग्ध पदार्थापेक्षां कमी उष्णमानावर पातळ होणारा मूळ स्निग्ध पदार्थ वाप-- रला असेल तर स्टिअरीक आसीड शेंकडा ५०-५५ भागांपेक्षा कमी तयार होतें. या स्टिअरीक आसिडाचें पातळ होण्याचें उष्णमान १३२° - १३५° फा. अंश असतें.

मेणबत्यांचें द्रव्य तयार करण्याची २ री रीत.

२ री रीत - स्निग्ध पदार्थास अति उष्णता व अति दाब देऊन मेणबत्त्यांचें द्रव्य तयार करण्याची रीत. या रीतीनें काम करण्याचे प्रकार तीन आहेत. चुन्याच्या साबण क्रियेनें मेणबत्त्यांचें द्रव्य तयार करण्याच्या शोधा- नंतर कोणत्याही आलकली किंवा आसिडाबरोबर स्निग्ध पदार्थ शिज- विल्यावांचून त्या स्निग्ध पदार्थाचे घटक ( ग्लिसराईन व स्निग्ध आ-- सिडें ) निरनिराळे करण्याचा शोध सुरू झाला. त्या शोधाअंती असें समजलें कीं अति उष्णतेखालीं स्निग्ध पदार्थ नुसत्या अति उष्ण वाफे-