पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२७

बरोबर शिजविला तर त्या स्निग्ध पदार्थाचे घटक ( ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें ) निरनिराळे होऊ शकतात. हा या रीतींचा पहिला प्रकार होय.

१ ला प्रकार - - या प्रकारानें काम करण्याची माहिती - एक

मोठे ऊर्ध्व पातनाचें यंत्र घेऊन त्यांत स्निग्ध पदार्थ टाकावा. नंतर त्या खाली विस्तवाची उष्णता देण्याची सुरवात करावी. नंतर त्यांत अति उष्ण वाफ (पान १०२ वरील टीप पहा) सोडावी. या ऊर्ध्व पातनाच्या भांड्यास उष्णता मोजण्याकरितां एक उष्णतामापक यंत्र लागू केलेलें असते. त्या उष्णता माफक यंत्रांत पारा ५७२-६००° फा. अंशावर आला ह्मगजे त्यांतील स्निग्ध पदार्थाच्या वाफे बरोबरच्या मिश्रणास ५७२ फा. अंश उष्णता लागली की त्या स्निग्ध पदार्थाचें पृथःकरण होतें. त्यासरसें स्निग्ध पदार्थातील भिन्न झालेल्या स्निग्ध आसिडांचें व ग्लिसराईनचें यांत्रिक मिश्रण, त्या यंत्रास लागू केलेल्या वाहक नळीतून ग्राहकांत वाहून येतें. हीं स्निग्ध आसिडें पांढरी असतात. पुढे त्यांतील ग्लिसराईन जें खराब झालेले असतें तें, सर्व मिश्रण स्थिर ठेवल्याने तळीं बसतें, व स्निग्ध आसिडें वर जमतात. खालचें ग्लिसराईन निराळे काढून वरचीं स्निग्ध आसिडें धंड्या व गरम दाबानें निराळी करावी. पण या प्रकारानें काम करण्यांत एक मोठी अडचण येते. ती ही की स्निग्ध पदार्थात असलेल्या ग्लिसराईन पदार्थास अति- उष्णता पोचल्याने त्या ग्लिसराईनमध्यें आक्रोलियन नांवाचा बाष्परूपीं, पदार्थ उत्पन्न होतो. या आक्रोलियन पदार्थाची अति वाईट व दाहक वाफ मनुष्याच्या श्वासांत गेली असतां फार इजा होते. या अडचणीमुळे या प्रकाराचा उपयोग मोठ्या प्रमाणानें काम करण्यांत करीत नाहींत. २ रा प्रकार – १८९३ सालीं मि. टिलवम्यान या अमेरि कन गृहस्थानें स्निग्ध पदार्थ व पाणी यांच्या मिश्रणास अति उष्णता व