पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२९

पाहिजे. तेव्हां त्यापासून काढून घेतां येईल असा तयार करावा. हा नळ लागू करण्यास त्या पात्राच्या एका बाजूस एक भोक कॉकसहीत असावें. या भोकावाटेंच त्या पात्रांत मिश्रण घालावे व त्यांतून बाहेर काढावें, या पात्राचा आकार बाहेरच्या बाजूनी पंचपात्रासारखा बाह्य गोल व वरचा आणि खालचा भाग हेही बाह्यगोल किंवा चपटे असा असावा. यास जो नळ जोडावयाचा त्याचा व्यासही ३ इंचापेक्षां मोठा नसावा. पंचपात्र व नळ हे दोन्हीं अर्ध्या पासून पाऊण इंच जाड पत्र्याचे केलेले असावे. तो नळ पंचपात्रास लागू करण्याच्या ठिकाणीं नुसत्या स्क्रूचे वेढे असून त्या पंचपात्राच्या बाहेरच्या बाजूस दोहोच्या संयोगस्थानाची जागा अति मजबूत करण्यास्तव स्क्रू मार- तां येईल अशी योजना करावी. नंतर पंचपात्राच्या आंतील व्यासापेक्षां थोडा कमी व्यासाचा गोल व जाड लोखंडी पत्रा त्या पंचपात्रांत अगो- दरच टाकून ठेवावा. कोणी या पत्र्या ऐवजी एक लोखंडी जाड सळई तें पंचपात्र तयार करतांनाच त्यांत उभी व सुटी ठेवतात. ह्मणजे मिश्र- ण भरलेले पंचपात्र एका बाजूने वर उचललें ह्मणजे तो पत्रा त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सहज जाऊं शकतो व तें जोरानें हलविलें असतां त्यांतील सळई त्यांत सहज फिरू शकते. दोन्ही सोई मुळे त्यांतील मिश्रण ढवळलें जातें. गोल पत्रा त्यांत टाकला असेल तेव्हां तें आडव्या व सळई टाकिली असेल तेव्हां तें उभ्या स्थितीत भट्टीवर ठेवावें; व त्याप्रमाणे त्याच्या वरच्या किंवा मधल्या भागीं उष्ण- तामापक यंत्र लावण्यास जागा केलेली असावी. ४ वर सांगितलेला नळ सुमारें १० फूट लांब असावा व त्याच्या शेवटों एक कॉक लागू करावा. थंड पाण्याने भरलेल्या हौदांत हा नळ बुडवून ठेवावा व पाण्याच्या पलीकडे गेलेल्या या नळाच्या शेवटच्या भागास वरील कॉक लावावा.