पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३१

पाण्याचा हौदही लहानशा आकाराचा पुरे होतो. नंतर त्या पंचपात्राचा कॉक उघडून त्यांतील अती गरम मिश्रण, थंड पाण्यांत ठेवलेल्या नळांत सोडावें. ह्मणजे त्यांतील उष्णता बरीच कमी कमी होत जाते. नंतर त्या नळींत थोडा वेळ तें मिश्रण ठेवून शेवटच्या भागाचा कॉक उघ- डावा. ह्मणजे त्याखाली ठेवलेल्या कॉकवाल्या लोखंडी पात्रांत ( हौदांत ) तें मिश्रण सर्व पडूं द्यावें. पंचपात्रांतील मिश्रण ६१२ फा० अंश गरम असतें ह्मणून इतके गरम मिश्रण बाहेर काढतांना तें पात्र फुटण्याचा संभव असतो. एवढ्याच करितां तें थंड करून नंतर बाहेर काढावें लागते.

याप्रमाणें तें अति गरम मिश्रण बरेंच थंड होऊन त्या शेवटच्या

पात्रांत आल्यावर स्थीर ठेवावें. ह्मणजे ग्लिसराईन तळीं जमतें व मिश्र स्निग्ध आसिडें वर जमतात. नंतर खालचें ग्लिसराईन खालच्या नळानें काढून घेऊन दुसरीकडे ठेवावें, व मिश्रस्निग्ध आसिडें काढून घ्यावीं. या मिश्र स्निग्ध आसिडांत पातळ व घट्ट अशा दोन्ही जातींची स्निग्ध आसीडें आहेत. ती पहिल्या रीतीच्या ४ थ्या व ५ व्या क्रियेप्रमाणे थंडा च गरम दाब करून निरनिराळी करावीं ह्मणजे कठीण जे स्टिभरीक आसीड ( मेणबत्यांचें द्रव्य ) तें तयार होतें..

तिसरा प्रकार.

२ प्या रीतीचा तिसरा प्रकार --चरच्या कामीं लागणारें पंचपा- त्र जसें पाहिजे तसें हमेशा बनविलें जात नाही, त्यामुळे अति उष्णता व अति दाबाखालीं हें काम करतांना पुष्कळ वेळां पंचपात्रें फुटतात. व त्यामुळे काम करणाऱ्या माणसास अति इजा किंवा मरण प्राप्त होतें आणि मालाची खराबी होऊन मालकांस नुकसान भोगावे लागतें. जितकें तें पंचपात्र जास्त मोठें असतें तितकें तें फुटण्याचा संभव जास्त असतो झणून लोखंडी जाड पत्र्याच्या नळामध्यें हें काम करण्याचा रिवाज कि त्येकांनी सुरू केला.