पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३३

      तिरप्या मुद्राक्षरातील मजकूरझाल्याने व मागून पंपाचा दाब मिळाल्याने त्या मिश्रणांतील पाणी व

स्निग्ध पदार्थ निराळे न होतां एकत्र रहातात. व भट्टींतील उष्णतेमुळे त्या मिश्रणास ६१२° फा. अंशाची उष्णता पोचते. याप्रमाणे ६१२ फा. अंश गरमीवर तें मिश्रण दहा मिनिटें राहिलें ह्मणजे त्याच्या घटकांचें पृथःकरण होते. नंतर त्या दरेक घटकाच्या स्वतंत्र अस्तित्वास लागेल इतकें पाणी शोषून घेऊन यांत्रिक संयोगानें मिश्र अशा स्थितीं- त त्या घटकांचें मिश्रण, थंड पाण्याच्या हौदांतील नळींत येतें. तें मिश्रण पुनः वर खालीं चढून त्याच्या बाहेरील काँकजवळ आले म्हणजे त्यांतील उष्णता पुष्कळ कमी झालेली असते. अती उष्ण मिश्रण जर एकदम बाहेर काढले तर त्यावरील दाब कमी झाल्यानें तो नळ फुटण्याचा संभव असतो. सबब तें अती गरम मिश्रण प्रथम थंड करून नंतर बाहेर काढावें लागतें. याच हेतूनें त्या हौदांत थंड पाणी भरून त्यांत तो नळ ठेवावा लागतो. याप्रमाणें बरेंच थंड झालेले मिश्रण कॉकवाटे दुसया लोखंडी हौदांत सोडावें. यांत मूळ स्निग्ध पदार्थातील घटक जे ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें तीं यांत्रिक संयोगानें मिश्र असतात. म्हणून तें तेथे कांहीं वेळ स्थिर ठेवावे. नंतर ग्लिसराईन काढून यावें व बाकी जीं मिश्र ( पातळ व घट्ट ) स्निग्ध आसिडें रहातात त्यांजवर मागें सांगितल्याप्रमाणें थंडा व गरम दाब करून मेणबत्यांचे घट्ट द्रव्य जे स्टिअरीक आसीड तें निराळे काढून ठेवावें. या प्रकारानें काम करण्यांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण दर वेळेस अल्प घ्यावे लागतें म्हणून स्टिभरीक आसीडही दर वेळेस थोर्डेच तयार होतें. फायदे....१ ग्लिसराईन व स्निग्ध आसिडें अधिक स्वच्छ तयार होतात. २ खर्च ३ वेळ कमी लागतो व ४ यांत्रिक सामग्री थोडी लागते.