पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३५

ते मिश्रण पाण्याबरोबर शिजवून नंतर उर्ध्वपातनानें त्यांतील स्निग्ध आसिडें निराळी काढावी असा शोध लावला. मि० जोन्स व मि० विल- सन यांनी सन १८४२ व १८४३ सालीं प्राईस कंपनीच्या नांवावर याच प्रकारानें काम करण्याचीं दोन पेटंटें मिळविलीं. या प्रकारांत स्निग्ध पदार्थावर प्रथम सलफ्युरीक आसिडाची क्रिया (चुन्याच्या क्रि- येप्रमाणें ) घडवून नंतर त्या मिश्र पदार्थावर पाण्याची क्रिया घडवि. तात; नंतर पृथक्करण पावलेलीं स्निग्ध आसिडें उर्ध्वपातनानें काढून घेतात, याप्रमाणे स्निग्ध पदार्थाचें पृथःकरण करून मेणबत्यांचें जें द्रव्य तयार होतें तें पहिल्या दोन रीतींनीं तयार झालेल्या द्रव्यापेक्षां प्रमाणानें अधिक पण रंगानें किंचित कमी पांढरें असें तयार होतें. चुन्याच्या साबध क्रियेनें चरबीच्या १०० भागापासून स्टिअरी- क आसीड ५०-५५ भाग निघतें तर याप्रकारानें तितक्याच चरबी पासून ६०--६५ भाग स्टिअरीक आसीड निघूं शकतें. पण चुन्याच्या साबण क्रियेनें काढलेल्या स्टिअरीक आसिडापेक्षां, सलफ्युरिक आसि- डानें काढलेलें स्टिअरिक आसिडाचे पातळ होण्याचें उष्णमान जरा कमी व रंगही थोडा कमी पांढरा अशा तऱ्हेचा माल तयार होतो. या प्रकारानें काम करण्यास लागणारी भांडीं, उर्ध्वपातनाचें यंत्र, हौद नळ्या वगैरे सामान व त्याची मांडणी ध्यानांत येण्याकरितां आकृ- ती नं. ४ चें चित्र दिले आहे ते पहा. या चित्राचें वर्णन.

या चित्रांत दाखविलेल्या भांड्यामध्यें सलफ्युरीक आसिडाची क्रिया

स्निग्ध पदार्थावर करण्याचें भांडे व उर्ध्वपातन करण्याचें भांडें व तद- नुषंगिक हौद, पंप, नळ्या, भट्या वगैरेची संयुक्त योजना केलेली असते. हे यंत्र लंडन येथील मेसर्स मेरीवेदर व सन्स ही कंपनी तयार करते. दर वेळेस एक टन ह्मणजे कच्चे १५ मण स्निग्ध पदार्थावर सलफ्युरीक आसिडाची क्रिया घडवून उर्ध्व पातन करण्यास पुरेल