पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४१

- इ या हौदांत प्रथमच सडफ्युरीक आसीड भरून ठेवावें, इ दाण्या नळीचा ग हा कॉक उघडून त्यांतील सलफ्युरीक आसीड ड मधील स्निग्ध पदार्थात सोडण्यास सुरवात करावी. नंतर नळाच्या मा- पानें तैं सलफ्युरिक आसिड २-२॥ मण त्या स्निग्ध पदार्थात पड- ल्यानंतर ग कॉक बंद करावा. डमधील स्निग्ध पदार्थ व हें सलफ्युरीक आसीड सर्व एकत्र झालें ( उष्णतेमुळे लवकर एकत्र होतात, ) म्हणजे आम्लक्रिया पुरी झाली असे समजावें. नंतर उष्णता [ वाफ ] बंद करावी, व तेथें [ड मध्यें ] तें मिश्रण सहा तास राहू द्यावें, या वेळेस ड मधील स्निग्ध पदार्थाचें पृथक्करण होऊन स्निग्ध आ- सिडें तयार होतात व ग्लिसराईन सलफ्युरीक आसिडानें जळून जाते. नंतर १०० भाग पाण्यांत २-४ भाग सलफ्युरीक आसीड असें अम्ल पाणी तयार करावें, या अम्ल पाण्यानें दरेक ज हौद एक तृती- यांशपर्यंत भरावा.

सहा तास झाल्यावर ड भांड्याचाच च कॉक उघडून त्यांतील स्निग्ध

द्रव्य दरेक ज हौदांतील पाण्यांत सोडावें. नंतर ज या प्रत्येक हौदांत त्यास लागू केलेल्या 'नळींतून वाफ सोडून तेथें तें अम्ल द्रव्य व अम्ल पाणी यांचे मिश्रण दोन तास शिजवावें. नंतर तेथेंच तें सर्व मिश्रण २४ तासपर्यंत स्थिर ठेवावें. २४ तास झाल्यानंतर वरचीं स्निग्ध आ- सिडें नळीनें आ या हौदांत सोडावीं. नंतर आ हौदांतून भ पंपानें ध नळीवादें ह या हौदांत ती सोडावी. यावेळेस हीं स्निग्ध आसिडें काळ्या रंगाचीं दिसतात ह्मणून त्यांचें उर्ध्वपातन करणे भाग पडतें. ह या हौदांत आल्यावर जर ती स्निग्ध आसिडें घट्ट झाली तर त्यास लागू केलेल्या नळींत वाफ सोडून ती पातळ स्थितींत ठेवावीं. नंतर ह हौदाच्या नळीचा व हा कॉक उघडून तिच्या वाटें ती य या उर्ध्वपा- तनाच्या भांड्यांत सोडावी.