पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४४

दुसरे कारखानदार हल्लीं नुसत्या ताडाच्या तेलापासून पामिटीक आसीड पुष्कळ तयार करतात. दरवर्षी सुमारें २५ हजार टन ताडाचें तेल या कामी वापरले जाते. युरोपमध्ये मात्र ताडाच्या तेलावर जबर जकात असल्यामुळे त्याचा उपयोग फारसा करीत नाहींत. ताडाच्या तेलापासून पामिटीक आसीड तयार करण्याची रीत वरील प्रकाराप्रमाणेंच आहे. परंतु थोडासा फेरफार आहे तो पुढें दर्शविला आहे.

वरच्या प्रकाराप्रमाणें ताडाच्या तेलावर प्रथम अम्लक्रिया करावी.

नंतर उर्ध्वपातनाने स्वच्छ केलेली मिश्र स्निग्ध आसिडें काढून घ्यावीं. ह्रीं मिश्र स्निग्ध आसिडें बरीच घट्ट असतात. सबब टेबलावर लागू केलेल्या फिरत्या सुरीवर त्यांचे मोठाले तुकडे धरून बारीक बारीक छिलटे ( काप ) तयार करावे. हे बारीक छिलटे क्यानवासच्या किंवा लोकरीच्या कपड्यांत सारखे पसरावे. उंच नीच नसावें. नंतर त्या कप- ढ्यावर नारळाच्या चटईचे तुकडे गुंडाळून हायड्रॉलिक प्रेसमध्ये ठेवावे. नंतर त्यावर थंडा दाब ८० - ८५° फा. अंश उष्णतेवर करावा. पुन्हां त्यावर गरम दाब ८५° – ९०° फा. अंश उष्णतेवर करावा. ह्मणजे त्यांतील पातळ जें ओलिईक आसीड तें बाहेर निघतें. पुढें अगदी घट्ट जें पामिटीक आसीड तें त्या कपड्यांतून चाकूनें खरवडून एका हौदांत टाकायें. तेथें तें गरमीनें पातळ अम्लपाणी ( १०० करून त्यांत - भाग पाण्यांत २. -३ भाग सल्फ्युरीक आसीड मिळविलेले, तितकेंच मिळवावें. हे सर्व मिश्रण सुमारे अर्धा तास उकळावे. नंतर स्थिर ठेवावें ह्मणजे पाणी खालीं व स्निग्ध आसीड वर जमतें. नंतर तें स्निग्ध आसीड काढून घ्यावे व त्याच्या चौपट गरम पाणी त्यांत मिळ- वावें. स्निग्धं आसीड घट्ट असल्यास जास्त गरम पाणी त्यांत मिळवून सर्व पातळ झालें ह्मणजे खूप जोरानें ढवळावें. नंतर स्थिर ठेवून वरचें स्निग्ध आसीड काढून घ्यावें. याप्रमाणे गरम पाण्यांत २।३ वेळ