पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४६

बुवून शेवटीं मोठ्या साचांत ओतून मोठाले गठ्ठे तयार करून कोठारात ठेवावे. यासच पामिटीक आसीड ह्मणतात. हें घट्ट, चकाकीत व पांढरें असून त्याचें पातळ होण्याचें उष्णमान १२५° १३०° फा. अंश असतें.

या एकव्या पामिटीक आसिडाच्या मेणबत्या करीत नाहीत. पण

स्टिभरीक आसिडांत हें मिळवून नंतर त्या मिश्र द्रव्याच्या मेणबत्या तयार करतात. या मिश्र व घट्ट द्रव्याचें पातळ होण्याचें उष्णमान ४० पाना- वर लिहिलें आहे तें पहा ह्मणजे मिश्रणाचें प्रमाण समजेल.

याचप्रमाणे कोकंचेल तेलापासून मेणबत्यांचें घट्ट द्रव्य तयार करून

तें तुपापासून काढलेल्या स्टिअरीक आसिडांत मिळवून धर्मकृत्यांत लागणाया मेणबत्त्या बनवाव्या. रा प्रकार. तिसया रीतीचा ३ रा प्रकार -या प्रकारानें हलक्या जातीचें स्टिअरीन (मेणबत्याचें द्रव्य तयार करतात. लोकरीच्या कारखान्यांस लोकर कातण्याच्या वेळी तीस तेल लावावें लागतें. तें. तेल ती लोकर धुर्ताना पाण्यांत मिळून गटरांत किंवा हौदांत निरुपयोगी म्हणून टाकून. देतात. याचप्रमाणे लोकरीच्या कारखान्यांत लोकर व तिचे कपडे धुतलेल्या पाण्यांत साब्रू व तेल हे पदार्थ असतात. तें पाणी खराब व निरुपयोगी म्हणून नदीत न सोडतां निराळ्या हौदांत सांठवितात. त्या पाण्यांतील तेल व त्या साबूंतील तेलकट द्रव्य फुकट जाऊं न देतां त्याचें हलक्या प्रतीच्या मेणबत्यांचे द्रव्य तयार करतात. तो प्रकार खालीं लिहिला आहे.

ज्या हौदांत तें निरुपयोगी पण साबू असलेले पाणी असतें त्यांत

सलफ्युरीक आसीड टाकून ते सर्व मिश्रण खूप जोरानें एक तासपर्यंत ढवळावें. त्या मिश्रणास अम्ल येईपर्यंत त्यांत सलफ्युरीक आसीड