पान:मेणबत्त्या १९०६.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४६

मिळवावें. जांभळ्या रंगाचा लिटमस कागद त्या मिश्रणांत बुडवून वर काढल्यावर तो कागद लाल किंवा गुलाबी दिसला म्हणजे त्यास अम्ल धर्म आठा असे समजावें. या प्रमाणानें सलफ्युरीक आसीड मिळवून ढवळून नंतर तें मिश्रण २४ तास स्थिर ठेवावें. म्हणजे त्याचे तीन थर होतात. १ पहिला व वरचा थर म्हणजे नुसता मळकट व तेल- कट फेस असतो. दुसरा व मधला थर म्हणजे निवळ पाणी असतें. ३ तिसरा व खालचा थर ह्मणजे तेलकट चिखल तळाशीं जमलेला असतो. याप्रमाणे तीन थर झाल्यावर त्यांतील मधलें पाणी वांकुड्या नळीने किंवा कॉकनें काढून टाकावें. व खालचा चिखल एका कपड्या- वर घालावा, ह्मणजे त्यांत मिश्र असलेले पाणी गळून खाली पडते. त्या कपड्यावर राहिलेला बराच घट्ट असा चिखल क्यानवास कप- डयाच्या पिशव्यांत घालून त्या पिशव्या हायड्रालिक प्रेसमध्ये ठेवून बाव्या. दाबतांना त्या प्रेसमधील द्रव्यास थोडी उष्णता द्यावी. ह्मणजे पाणी व मळकट स्निग्ध आसिडें एकत्र अशीं बाहेर निघतात, नंतर तें मिश्रण स्थिर ठेवावें, म्हणजे पाणी खालीं व स्निग्ध आसिडें वर जम- • तात. वर जमलेलीं स्निग्धं आसिडें काढून या रीतीच्या पहिल्या प्रका- रांत लिहिल्याप्रमाणें तीं उर्ध्वपातनानें गाळून काढावीत. नंतर पुनः दाबावीत. ह्मणजे प्रेसमध्ये पिवळ्या किंवा पिवळट रंगाचें व घट्ट द्रव्य राहतें. या पिवळ्या कठिण द्रव्याच्या मेणबत्त्या करतात, पण त्या हलक्या प्रतीच्या असतात. बाहेर निघालेलें तेल पुनः लोंकरच्या उपयोगांत आणावें. दा-

४ था प्रकार..

३ व्या रीतीचा चवथा प्रकार - या प्रकारानें काम करणंयत स्निग्ध पदार्थावर सलफ्युरीक आसिडाची अम्लक्रिया घडवूनही ग्लिस-