पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. ज्याद्वारे आपले शरीर, मन, बुद्धी व चित्त यांना संचलित करून एकाच दिशेने वळवीता येते व कर्मयोग आणि ज्ञानयोग साधण्यास मदत होते. काही शिबीरार्थींना विस्मयकारक प्रचिती आली. त्यामध्ये श्री अरेकर (मुख्याध्यापक चाफेकर प्रशाला, चिंचवड) यांना अनेक वर्षापासून डावा पायावर सुज होती. सरावा दरम्यान ४ थ्या दिवशी त्यांच्या पायावरील सुज कमी झाली. तसेच सौ. स्वाती कुलकर्णी यांना १५ वर्षापासून मांडी घालता येत नव्हती. पण शिबीराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी २ तास बसून सराव केला. असे अनुभव ऐकल्यावर सूर्यनमस्काराच्या परिणामकारकतेची प्रचिती आली. श्री. खर्डेकर यांचा अभ्यास परिपूर्ण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सूर्यनमस्कार घातल्याने माझ्या शरीरातील गाठी नाहीशा होवून नवऊर्जा व सात्वीकतेची अनुभूती येत आहे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे। ते विज्ञान जनास सांगावे । तरतेने बूडो नेदावे। बुडतयासी।। प्रचारा दरम्यान असे लक्षात आले की व्याधीमुळे त्रस्त असलेल्या लोकांना सूर्यनमस्कार साधना करता येत नव्हती. मग काकांकडे मी तगादा लावला विकारांसाठी सूर्यनमस्कारांची उपयुक्तता याकडे लक्ष देऊन काही ग्रंथ निर्मती करावी. थोड्या प्रयासानंतर काकांना याची प्रचिती येऊन या कार्यास प्रारंभ झाला व 'मेदवृद्धीतून मुक्ती' हे या माळेतील एक पुष्प. लोकांना त्रिविधतापातून मुक्त करणे हिच खरी ईश्वर सेवा आणि हि ईश्वरसेवा श्री. खर्डेकर काका एक तपाहून अधिक काळापासून करित आहेत. सदर ग्रंथ हा असा एकमेवाद्वितीय आहे ज्यामध्ये सूर्यनमस्काराचे अध्यात्मिक व आरोग्य विज्ञान यथायोग्य अनुवादले आहे व निश्चित साधकांसाठी हा संजीवनी ठरेल. श्री. खर्डेकर काकांना, त्यांच्या ज्ञानाला, प्रयत्नाला शब्दांत सांगण्याची पात्रता माझी नव्हे. माझ्या दृष्टीने ते एक 'सूर्यनमस्कार तपस्वी' आहेत आणि ह्याची प्रचिती हा ग्रंथ वाचल्यावर आपणासही आल्यावाचून राहणार नाही. मेदवृद्धीतून मुक्ती १०