पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायूंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण- दाब पडणार नाही याची काळजी घेणे. भुजंगासनामध्ये प्राणतत्त्वाचा सर्वात जास्त स्वीकार करण्याचा प्रयत्न करणे. स्वाधिष्ठान चक्राकडे मन केंद्रित करणे. शक्य होईल तितके शरीर कमरेतून मागे ढकलणे. साष्टांगनमस्कार आसनामध्ये शरीराची (मणिपूर चक्राची) कमान असते. भुजंगासनामध्ये शरीराची (स्वाधिष्ठान चक्राची) उलटी कमान करणे. विशुद्ध चक्राकडे मन एकाग्र करणे. आसन करतांना १. श्वास घेण्याकडे लक्ष देणे, २. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देणे, ३. दृष्टी आकाशात पश्चिमेकडे ठेवणे, ४. पोट-ओटीपोट यावर पडलेला ताण स्वीकारणे. आरोग्य लाभ हस्तपादासन (स्वाधिष्ठानचक्र) प्रमाणे. भुजंगासन कृती गुडघे व चवडे आहेत त्याच ठिकाणी ठेवा. स्वाधिष्ठानचक्र हाताची जागा तिच ठेवा. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष द्या. गुडघ्याचा आधार घ्या. दीर्घ श्वास घ्या. घोट्यांचा पुली सारखा वापर करून शरीर पुढे ओढा. गुढघे दोन इंच पुढे आणून टेकवा. दीर्घ श्वास घ्या. हाताने जमिनीवर दाब द्या खांदे वर उचला. दीर्घ श्वास घ्या. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देऊन खांदे मागे ढकला. दीर्घ श्वास घ्या. शक्य होईल तेवढे डोके पाठीमागे ढकला. मेदवृद्धीतून मुक्ती भुजंगासन १३८