पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • खालील श्लोकांची प्रचिती शरीर स्तरावर अनुभविण्यासाठी.

अकालमृत्यु हरणं सर्व व्याधिविनाशनम् सूर्य पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्।। उरसा शिरसा दृष्ट्या वचसा मनसा तथा । पदाभ्यां कराभ्यांजानुभ्यां प्रणामोऽष्टांग उच्यते ।। सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग उद्दिष्ट्ये-

  • आत्मारामाकडून सूर्यनमस्काराची दीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या

प्राथमिक कौशल्यांचा सराव करणे.

  • सूर्यनमस्कार साधक, कार्यकर्ते, संघटक व प्रशिक्षक तयार करणे.
  • प्रत्येक सहभागी साधकाला वर्षभरामध्ये स्वतंत्रपणे सूर्यनमस्कार प्राणायाम

प्रशिक्षण वर्गाचे आयोजन व प्रशिक्षण देण्यास सक्षम करणे. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग सूचना- प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी नाव नोंदणी फॉर्म संपूर्ण भरा. तो जमा करा. त्यामधील सूचनांची पूर्तता करा. नोंदणी अर्जासाठी एक व प्रमाणपत्रासाठी एक असे दोन फोटो जमा करा. सहभाग घेणाऱ्या साधकास काही व्याधी-विकार असल्यास त्याची पूर्व कल्पना द्या. काय त्रास होतो आहे तसेच वैद्याने दिलेल्या सूचना काय आहेत यांचा उल्लेख नाव नोंदणी अर्जामध्ये करा. असे केल्याने उपयुक्त मार्गदर्शन करणे शक्य होईल. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग पूर्व तयारी - www.suryanamaskar.info या संकेतस्थळाचा संदर्भ घ्या. संस्थेने प्रकाशित केलेल्या साहित्याचा वापर करा. संस्थेच्या संपर्कात राहा. सूर्यनमस्कार प्राणायाम सराव सत्र सूचना पोट साफ करून, अंघोळ करून. वेळेपूर्वी पाच मिनिटे उपस्थित रहा. सूर्यनमस्कार सरावापूर्वी तीन-चार तास खाणे बंद ठेवा. मेदवृद्धीतून मुक्ती - १५७