पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चालूच राहिला, कल्पांता पर्यंत चालूच राहील. त्यानंतरही हे ज्ञान वातावरणात राहील आणि पुन्हा श्रुती-स्मृती- स्फूर्ती च्या माध्यमातून त्याचा प्रवास सुरू होईल. म्हणूनच ज्ञानतत्त्व इतिहास, भूगोल, संस्कृतीच्या पलीकडचे असते. ते सनातन तत्त्व आहे. शाश्वत सत्य आहे. त्यामध्ये कधीही कोठेही, केव्हाही बदल होण्याची सुतराम शक्यता नसते. प्राचिन काळी ऋषी-मुनींना ध्यानावस्थेत असतांना सूर्यनारायणाचे ज्ञान झाले. चारही वेदामध्ये या सूर्यज्ञानाचे दर्शन होते. या सर्व सूर्यज्ञानाचे संकलन एका वाक्यात केलेले आहे. सूर्य: आत्माजगतस्तस्थुषश्च । - ऋग्वेद, यजुर्वेद. (अर्थ- सूर्यनारायण अखिल विश्वाचे भरण-पोषण-संवर्धन-संचालन करणारा ब्रह्मांडाचा अंतरात्मा आहे.) सूर्यनमस्कार घालतांना आपण सूर्याची प्रार्थना म्हणतो- ध्येयः सदासवितृमंडल मध्यवर्ति नारायणः सरसिजासनसन्निविष्टः। केयूरवान् मकरकुंडलवान् किरीटी हारी हिरण्यमयवपुर्घृतशंखचक्रः।। - बृहतपाराशरस्मृयति आदित्यहृदय, १३८ (श्लोकाचा अर्थ आकाशातील सूर्यमंडलात मध्यवर्ती असलेला, कमलासनावर बसलेला, हातात बाहुभूषणे व कानात मकराकृती कुंडले व डोक्यावर मुकूट धारण करणारा, गळ्यात हार घालणारा, सर्वांचे दुखः हरण करणारा, सुवर्णमय कांती असलेला, हातांमध्ये शंख, चक्र, धारण करणारा अशा नारायण स्वरूप सूर्यदेवतेला मी वंदन करतो. (माझे सर्व जीवन प्रकाशमान व्हावे म्हणून त्याची प्रार्थना करतो.) या प्रार्थनेतील 'मंडल मध्यवर्ति' या शब्दाच्या अर्थाचे चिंतन करू. यातून आपल्याला सूर्यनमस्काराचे विश्वरूप लक्षात येईल. सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात करण्यापूर्वी सूर्यनारायणाची केलेली ही प्रार्थना आहे. ध्येयः सदा याचा अर्थ आहे (मी) सदा ध्यान करतो. तुझ्याशी माझे अखंड अनुसंधान असावे म्हणून मी तुझी आराधना करतो. तुझे दैवी गुण माझ्यामध्ये यावेत म्हणून मी उपासना करतो. तुझे सौर सामर्थ्य मला मिळावे म्हणून मी तुझे व्रत करतो इत्यादी. या प्रार्थनेमध्ये सूर्यदेवतेने म्हणजे आदित्य नारायणाने साधकांनी अर्पण केलेले सूर्यअर्घ्य स्वीकारावे म्हणून त्याला आवाहन मेदवृद्धीतून मुक्ती २१ -