पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन्निपात असल्यास मूत्र संमिश्र वर्णाचे असते. सप्तधातूरोग, इंद्रियरोग असल्यास मूत्र तेला सारखे असते. जलोदरामध्ये मूत्र तुपाच्या कण्याप्रमाणे असते. वात-कफ-पित्ताचे विकार एकत्रित असल्यास मूत्र काळसर मिश्रवर्ण असते. तिनही दोषांचे विकार असल्यास आजार असाध्य समजावा. सूर्यस्पंदनांचा प्रभाव सर्व शरीरावर सातत्याने होत असतो. त्याचे चांगले वाईट झालेले परिणाम आपल्याला दृष्य स्वरूपात सूचित केले जातात. आरोग्याची काळजी घ्या हा संदेश दिला जातो. नाडीपरीक्षा, मूत्रपरीक्षा प्रमाणेच इतरही माध्यमातून हा संदेश दिला जातो जसे- जिव्हा, लाळ, मल, नेत्र, रूप, शब्द, स्पर्श इत्यादी. आपले आरोग्य व आनंद अबाधित ठेवण्यासाठी या सूचना निसर्ग आपणाला देत असतो. हाच निसर्गन्याय आहे. शरीराचा धर्म आहे. या निसर्गन्यायाचा यथार्थ अन्वयार्थ लावण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी, आपले स्वतंत्र परिमाणे वापरून यंत्रसामुग्री तयार केलेली आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार सर्वत्र दिसून येतो. ऊठसूट काही त्रास झाल्यास या यंत्राकडून निसर्गाचा संदेश घेणे कमी व्हावे, शरीरधर्माकडे अधिक लक्ष देता यावे, आहारात योग्य तो बदल करून आरोग्य सांभाळता यावे यासाठी वेगवेगळ्या परीक्षांची प्राथमिक माहिती दिलेली आहे. आपल्या आजाराचे निदान करणे व त्यावर औषधोपचार करणे आपले काम नाही. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे. "स्वास्थ्यसिद्धी ही एक श्रेष्ठ ईश्वरोपासना आहे', हे लक्षात ठेवा. ईश्वराशी सततचे अनुसंधान ठेवण्यासाठी शरीरधर्माचा दररोज मागोवा घ्या. आपले आरोग्य अबाधित ठेवा. सर्वरोग-व्याधी-विकार- व्यसन दूर ठेवा. मेदवृद्धीतून मुक्ती 7 ॥जय जय रघुवीर समर्थ ।। २९