पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नित्य उपासना विधी आहे. जीवाची निर्मिती किंवा व्यक्तीची निर्मिती हे परब्रह्माचे कार्य आहे. हे प्रत्येक कार्य सर्वार्थाने परिपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे. आनंददायी आहे. आपणच आपल्या मनोविकाराने (काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ, शोक, चिंता, स्पर्धा इत्यादी) हा आनंदप्रकाश प्रदुषित करत असतो. आत अंधार आणि बाहेर सूर्यप्रकाश अशी अवस्था होते. अंतःकरणात अंधारून आल्यावर बाहेर प्रकाशदिवे प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतो. जीवघेण्या स्पर्धेमध्ये यश व आनंद मिळविण्यासाठी सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या पाठीमागे धावतो. सूर्योपासना ही तेजाची उपासना आहे. ती अग्नीची उपासना आहे. सूर्यनमस्कार हा कायिक सूर्योपासनेचा एक प्रकार आहे. स्थूल शरीर व सूक्ष्मप्राण चैतन्याची पूजा आहे. स्थूल-सूक्ष्म शरीर प्रकृतीच्या आठ अंगांचा वापर करून सूर्यनमस्काराची साधना करायची आहे. सूक्ष्म प्राण चैतन्याच्या अधीन होऊन पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार या अष्टधा प्रकृतीला विकारमुक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांना वैश्विकचैतन्य म्हणजेच प्राणतत्त्वाचा अधिकाधिक पुरवठा करून शरीरातील पंचमहाभूते व त्रिदोष यांचे संतुलन प्रस्थापित करायचे आहे. आपले आरोग्य व आनंद वृद्धिंगत ठेवायचे आहेत. सर्वांगीण व्यक्तिमत्व स्वयंभूरित्या प्रत्यक्षात येते याचा अनुभव घ्यायचा आहे. या साधनेत सूक्ष्म व स्थूल शरीर विकसित करता येते. शरीर-मन-बुद्धी यावर या साधनेचा प्रभाव सारख्याच प्रमाणात होतो. पद्धतशीरपणे १२+०१ सूर्यनमस्कार घातल्यानंतर शरीरातील अवयव व त्यातील स्नायुंवर झालेला परिणाम आपणाला चांगलाच जाणवतो. याच प्रमाणात मन- - बुद्धी यांच्यावरही या सूर्यनमस्काराचा परिणाम झालेला असतो. आपल्या वागण्या-बोलण्यातून तो इतरांना प्रकर्षाने जाणवतो. वागण्या-बोलण्याची समज येणासाठी बुद्धीचे आरोग्य उत्तम असले पाहिजे. शरीर स्वास्थ नसले तर बुद्धी स्थिर कशी राहणार? साधी भूक लागलेली असेल तरी कानाला दिलेल्या सूचना ऐकू येत नाहीत. त्या डोक्यापर्यंत पोहचत नाहीत. मन त्यात लक्ष घालत नाही. भुकेचा विकार बळावला की मन- - बुद्धीचा समतोल बिघडतो. वागण्या-बोलण्याचा नाद आणि ताल चुकतो. हा अनुभव तुमचा माझा सर्वांचा आहे. म्हणूनच सुश्रुताने आरोग्याची व्याख्या खालील प्रकारे केलेली आहे. मेदवृद्धीतून मुक्ती ३३