पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। ८. तारक त्रयोदश गुणविशेष सूर्यनमस्काराचे अनेक प्रकार आहेत. ते अनेक वेगवेगळ्या पद्धतीने घातले जातात. प्रत्येक सूर्यनमस्कार साधकाची शारीरिक-मानसिक कुवत वेगवेगळी असते. त्याप्रमाणे प्रत्येक साधकाचे सूर्यनमस्कार तंत्र वेगवेगळे असते. असे असले तरी प्रत्येक आसन स्थिती घेतांना किमान प्राथमिक तीन वैशिट्यांचे पालन केले जाते. ते आहेत- सूर्यनमस्कार घालतांना प्रत्येक आसनाच्या श्वास प्रणालीकडे लक्ष देणे. २. प्रत्येक आसनातील ऊर्जाचक्राकडे मन एकाग्र करणे. १. ३. प्रत्येक आसन करतांना दृष्टी केंद्र कोठे ठेवायचे याकडे लक्ष देणे. या प्राथमिक नियमांचा वापर सूर्यनमस्कारामध्ये करता आला नाही तर शरीरावर अनपेक्षित परिणाम होतात. स्नायूंचे दुखणे सुरू होते. सूर्यनमस्कार घालणे शक्य होत नाही. साधना खंडित होते. पुन्हा केव्हातरी ती सुरू होणार आहे हे निश्चित. पण केव्हा हे मात्र अनिश्चित असते. हे प्राथमिक नियम पाळले तर सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे सुरू राहते. सूर्यनमस्काराची संख्याही वाढते. काही त्रासही होत नाही. पण सूर्यनमस्काराची सुरूवात ज्या कारणासाठी केली ते काही साध्य होण्याची लक्षणे दररोजच्या साधनेत दिसत नाहीत. शरीराचा आकार, वजन यामध्ये बदल होत नाही. पचन संस्थेमध्ये अपेक्षित सुधारणा होत नाही. पोटाचा आकार बदलत नाही. या व इतर कारणांमुळे दररोज सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार घालण्यालाचा कंटाळा येतो. काहीतरी कारणे दाखवून मनाची समजूत घातली जाते. त्याच्याच संमतीने आपडी-थापडी, झटपट सूर्यनमस्काराचे नित्यकर्म उरकले जाते. सूर्यनमस्काराचा प्रभाव शरीर-मन-बुद्धीवर एकसारख्याच प्रमाणात होतो. सूर्यनमस्कार साधना स्थूल शरीर व सूक्ष्म प्राण चैतन्याची पूजा आहे. ती एक सर्वांगीण व्यक्तीमत्त्वाचा विकास करणारी एकमेव कायिक साधना आहे. मेदवृद्धीतून मुक्ती ५२