पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येणे वगैरे त्रास हाऊ शकतो. तो टाळण्यासाठी ही प्राथमिक प्रतिबंधक उपाययोजना आहे. मलावरोध नाशक - साहित्य - बाळहिरडा, यालाच काळाहिरडा म्हणतात. साजूक तूप. औषध करण्याची कृती आवश्यक असतील तेवढे बाळहिरडे घ्या. सायंकाळी ते पाण्यामध्ये भिजत टाका. बाळहिरडे पाण्यात बुडतील येवढेच पाणी वापरा. सकाळी ते टरारून फुगलेले असतील. नसल्यास अधिक वेळ भिजू द्या. पाण्यातून काढून घ्या. साजूक तूपात खमंग भाजा. कुरकुरित करा. औषधाची मात्रा - सकाळी व रात्री दोन वेळा एक एक हिरडा चावून खा. नंतर किंवा खाता खाता गरम दूध एक कपभर घ्या. पथ्योपचार - सारक असलेले अन्न पदार्थ, फळे आणि पेय घ्यावित. औषधा बरोबर घ्यावयाच्या दुधात साखर टाकू नका. फारच गरज वाटल्यास थोडी टाका किंवा एक बत्तासा वापरा. साखरेच्या पचनासाठी हाडातील कॅल्शियम व रक्तातील लोह वापरले जाते हे लक्षात ठेवा. - उपयुक्तता फास्टफूड म्हणजे भूक भागविण्यासाठी झटपट, लगेच, ताबडतोब मिळणारे अन्न. पण हे फास्ट-एजिंग - फूड आहे. म्हणजेच म्हातारपण लवकर आणणारे अन्न आहे. याउलट बाळहिरडा वृद्धत्व आनंदाने व उत्साहाने उपभोगण्यास आधार देते. विविध विकार दूर राहतात. शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, वीर्य या सप्तधातूंना बळ मिळते. हा घरगुती सोपा, स्वस्त आणि मस्त परिणामकारक उपाय आहे. पित्तप्रकृतीसाठी अधिक उपयुक्त आहे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. ऋतू बदल होतांना होणारा कोणताही त्रास कमी करण्यासाठी उपयोगी आहे. मलावरोध नाशक - साहित्य - गुलकंद २५ ग्रॅम, सोनामुखी २५ ग्रॅम, मनुका (बिया काढलेल्या) औषध करण्याची कृती- गुलकंद २५ ग्रॅम व मनुका खलात कुटाव्यात. सोनामुखी पावडर टाकत जावी. त्याचा नरम गोळा तयार झाल्यावर बोरा येवढ्या गोळ्या कराव्या. मेदवृद्धीतून मुक्ती ८०