पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
पहिल्या प्रकारचा उच्चालक

धार आहे, आणि ब उच्चाल्यवजन आहे. आकृतींत दाखविलेली फपासून अपर्यंत बाजू जितकी लांब असेल, त्याप्रमाणे ९१ पृष्ठावरील सांगितलेल्या रीती- वरून वजन उचलण्यास उच्चालक शक्ति थोडी पुरेल. त्याच आकृतींत जर फ क बाजूचे दुप्पट अफ बाजू आहे, तर उच्चालकास दुप्पट शक्ति मिळाली असें ह्मणतात; ह्मणून अ वजन कितीही मोठे असो तथापि उच्चालकाचा सहाय्यावांचून त्यास उचलण्यास जी शक्ति लागेल, तिचा निम्मे शक्ति अ टोंकावरून उच लण्यास पुरेशी होईल. - जर फ टेंकू व वजनाकडे सारिला, असा कीं अ फ बाजू कफ बाजूचा दसपट होईल, तर उच्चालकाचा आंगीं दसपट सामर्थ्य येईल; आणि याप्रमाणें उत्तरोत्तर अधिक सारित गेलें अस- तां अधिक सामर्थ्य येत जाईल. असें जरी आहे तरी या पक्षी क टोंक जितके वर उंच होईल, त्याचा दस- पट अ टोंक खालीं होईल; यामुळे वजनास अति ल- हान चलन मिळेल. अब क, ( आकृति ६० वी) ही उच्चाल- काची दुसरी एक आकृति आहे, तींत ब टेंकू आहे, अपा- सून ब पर्यंत उच्चालकाची लांब बाजू आहे, आणि पासून क पर्यंत तोकडी बाजू आहे. अ आकृति ६०. अ व प टोकावर भार घालणारी उच्चालकशक्ति प आहे. तों- कड्या बाजूवर व स्थळीं टांगिलेलें उच्चाल्यवजन व आहे.