पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माहितगारीचे दृष्टांत.

९७

वजन १०० शेरांचें आहे, याजकरितां दुसऱ्या वज- नास तोलून धरावें ह्मणून हैं वजन टेंकूपासून २ फुटी लांब असावें; कां कीं, (२x१०० = २००) तर याव- रून असें कळतें कीं उच्चालकाचा जा बाजूस वजन टांगलें असतें, ती बाजू दुसऱ्या बाजूचा पेक्ष जर २, ३, अथवा ४ पट लहान असेल, तर प्रत्येक पक्षीं तुलना होण्याकरितां, लांब बाजूचा टोकावरचें वजन दुसऱ्या बाजूचा वजनापेक्षां २,३, अथवा ५ पट हलके असावें.

 व्यवहारांत या उच्चालकाचा आधारापासून झाल- लीं अशी यंत्रे नेहमी उपयोगांत येतात. लोखंडाचा बळकट खिळ्यावर ठेविलेला असा लांब उच्चालक युद्ध- प्रसंगी तोफा मारण्यांत गोलंदाजांस लागतो.

 गवंडी, पाथरवट, इत्यादि कारागीर लोक, मोठमोठीं वजने थोड्या स्थळांतून उचलण्यासाठीं, तरफरूप उच्चा लकाचा उपयोग करितात. दरवाजे, कुलपें, अथव बिजागरीं मोडण्यासाठीं चोर लहानसा खिळा घेतात.

 भटींतील कोळसे सारण्याकरितां जी लोखंडाची शीग घेतात, ती या विषयाचे एक उदाहरण आहे; तिला भटीची बाजू हा टेंकू आहे, व मनुष्याचा हा ताचा दाब ही शक्ति आहे, आणि कोळसे हैं उचलावयाचें वजन आहे.टैंकू आणि वजन ठेव- ण्याचें ठिकाण यांमधील अंतर, यापेक्षां टेंकू आणि शक्ति यांचे अंतर जितके मोठे असेल, त्याप्रमाणे या सर्व उदाहरणांत उच्चालकास शक्ति मिळेल, जर