पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तराजू.

९९

प्रेरणा आहेत. उच्चालकाचा जा योजना आहेत त्यां- तून ही एक सुंदर आणि उपयोगी योजना आहे. जेव्हां तराजूचा परड्यांत सारिखीं वजने असतात, तेव्हां दांडी सारिखी आडवी राहत्ये, कां की टेंकूपासूनचीं अंतरें समान वजनानें गुणिलीं असतां गुणाकार बरो- बरच होतील, याजवरून परड्यांवर समान वजनाचे समान झोंक विरुद्ध दिशेंत घडतात, तेणेंकरून ते झोंक एकमेकांचा फलाचा नाश करितात, आणि ते करून परडीं रिकामीं असतांना जी त्यांची स्थिति असले, त्या स्थितीप्रमाणें तीं राहतात. जेव्हां परड्यांत समान बजने असतात तेव्हांच मात्र तराजू आडवी सारिखी राहत्ये हे उघड आहे; कारण की जर एक वजन दुसऱ्यापेक्षा अधिक असेल, तर तराजू मोठ्या वजनाकडे झुकेल. -

ठकविण्याचा हेतूनें कृत्रिमी तराजू नेहमी करि-तात, त्यांत तोलायाचा पदार्थ ठेवायाची बाजू, दुसन्या वजन ठेवायाचा बाजूपेक्षां लांब असत्ये, त्यामुळे एक बाजू दुसरीपेक्षां जितकी लांब असये, तितका एकादा पदार्थ कमी तोलला जातो. तोलण्याचा पदार्थ आ णि वजन यांचा पालट केल्यानें तराजूचा खोटेपणा समजांत येतो. जर पदार्थाचें खरें वजन काढण्याचें आहे, तर ते या पुढील कृतीनें काढितां येईल; पदार्थ दोहों परड्यांत वजन करावा आणि त्या वजनांचा गु- णाकार करून त्या गुणाकाराचें वर्गमूळ काढावें, ते त्या पदार्थाचें खरें वजन होईल. जसे एक पदार्थ एक