पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्तोलयार्ड.

१०१

ड्यांतील वजनास तोलून धरील अशा ठिकाणीं जेव्हां त्या लहान वजनास नेऊन ठेवितात त्या ठिकाणींचा अंक त्या पदार्थाचे वजन दाखवितो; उदाहरण, जर प वजन एक शेर असून ते ६ व्या अंकाशी आहे तर, आपल्या साहापट वजनास अथवा ६ शेर वजनास परड्यांत तोलून धरील हे उघड आहे. -

 चिनईलोक लहान पदार्थ नाजूक स्तीलयार्डाने तोलितात; त्याची दांडी लांकडाची असत्ये, आणि ती सुमारे ६ इंच लांब असत्ये, आणि तीस एक भोक पा डून त्यांतून बारीक रेशिमाची दोरी घातलेली असत्ये, ती टेंकूचें काम करिये, त्याजबरोबर एक लहान वजन असतें, तें त्या दांडीवरून हवे तिकडे सारितां येतें, आणि तोलण्याचे पदार्थ ठेवण्याकरितां दांडीचा तों- कड्या बाजूस एक लहानसें परडें असतें. -

 डेनिश लोकांची तराजू ही स्तीलयार्डाचा एक प्रकार आहे, त्यांत वजनाचें स्थान बदलावें तें न बद- लतां टेंकूचें स्थान बदलतें. ती तराजू अगदीं साधी आहे. त्यांत एका लोखंडाचा दांडीचा एका टों- कास वजन बशिवलेलें असतें आणि दुसऱ्या टोकास आंकडा असतो, व एक कडी दांडीवरून सरत्ये, ती ढेंकूचें काम करत्ये, तिचा योगानें सर्व उचलून धरितात. तोलण्याचा पदार्थ आंकड्यास टांगितात, आणि तुलना होईपर्यंत टैंकू सारितात; नंतर दांडी- वरचा भागचिन्हावरून वजन किती आहे ते समजते. या तराजूचा आंकड्यास अनुक्रमानें १, २, ३ इत्यादि