पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जडता--माहितगारीचे दृष्टांत.

तर व्यास जमीनीवर पाय लागल्यावर पुढे पडण्याचें मोठें भय असतें. खंदकावरून उडी मारणारा, आ- पल्ये आंगांत वेग यावा आणि त्या योगानें खंदक उडून सहज जातां यावें ह्मणून तो कांहीं अंतरावरून धांवायास आरंभ करितो. घोडेस्वार, दोन घोडे स्थिर असतां जसा एका घोड्यावरून दुसरे घोड्यावर सहज बसतो, . त्याच प्रमाणें तो धांवत्ये घोड्यावर उभा राहून दुसरे जवळचे धांवणारे घोड्यावर सहज बसतो; कां कीं त्याचे खालचे घोड्याचा वेग त्याचे आंगीं आला अस- तो, आणि दुसन्ये घोड्यावर बसेपर्यंत त्याचे आंगीं तो वेग तसाच असतो. जर दुसरा घोडा उभा असला तर तो मनुष्य घोड्याचे मानेवरून उडून जा- ईल; आणि स्थिर घोड्यावरून पळत्ये घोड्यावर चढूं लागला तर तो मागें पडेल. त्याच प्रमाणे एकादें गल- बत फार चालत असलें, आणि जर त्याचे डोल काठीचे टोंकावरून दगड सोडिला तर तो काठीबरोबर चालून तिचे बुडाशीं येऊन पडतो, मागे पडत नाहीं; कारण टाकणाराचे हातांत असतांना जो वेग त्या दगडांत आला असतो, त्याचा योगानें तो पडत पडत काठीचे बुंधाशी येतो.

 खालीं लिहिलेल्ये कृतीवरून जडतेचा धर्म उघड दाखवितां येतो. बोटाचे अग्रावर एक गंजीफ सम- तोल ठेवून तिजवर एक रुपया ठेव ; नंतर गंजिफेस जोरानें टिचकी मार, ह्मणजे ती रुपयाखालून नि- घून जाईल; परंतु रुपया आपले जडतेमुळे बोटावर