पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
सोपे प्रयोग

जर उच्चालकाचा दुसऱ्या बाजूस दोन वजने टांगिली आहेत, ह्मणजे र वजन आठ तोळ्यांचे, मध्यापासून दोन इंच अंतरावर आहे, आणि फ वजन चार तो यांचे असून एक इंच अंतरावर आहे; तर,

र वजनाचा मोमेंट ८x२ अथवा १६ आहे, फ वजनाचा मोमेंट ४४१ अथवा ४ आहे,
२०

यावरून प्रत्येक पक्षीं मोमेंटांची बेरीज सारिखी आहे, ह्मणून उच्चालक स्थिर राहील.

 मनांत आण कीं उच्चालकाचा एका बाजूस क मध्यापासून दोन इंचांवर साहा तोळ्यांचे वजन टां गिलें आहे, आकृति ६६ वी आकृति ६६.. पाहा, तर तीन तीन तोळ्यां- चींब, ड, अशीं दोन वजनें फ भ दुसऱ्या बाजूस मध्यापासून दोन इंचांवर फ स्थळीं टां- गिलीं असतां तुलना होईल; परंतु जर या दोन वजनांतून प्रत्येक वजन फ स्थळा- पासून दोन इंच उलट्या दिशेस सारिलें, तर ड वजन क मध्याशी येईल, आणि उच्चालकावर त्याचा व्यापार वालणार नाहीं, आणि एकटें व वजन अ वजनास तोलून धरील; कारण ब चें वजन तीन तोळे आहे, आणि तें मध्यापासून चार इंच अंतरावर आहे, ह्मणून त्याचा मोमेंट १२ आहे, जसें (४x२= १२), आणि