पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
दुसऱ्या प्रकारचा उच्चालक.

टेकू आणि शक्ति यांचें अंतर जसें अधिक असेल, तसा यांत नफा होईल. जसें, उच्चालकशक्ति प जर चार तोळे असून कूपासून साहा इंचांवर असेल, तर ति- चा योगानें एक इंच अंतरावरील चोवीस तोळ्यांचे वजन तोलितां येईल. कारण दोहोंपक्षी मोमेंट सा- रिखेच होतात, ह्मणजे (४x६ = २४) आणि (२४ ×१=२४). जर फ आणि अ यांचा बरोबर मध्यभागी व वजन असले, तर त्याचा अर्थे वजनास फ टेंकूपा- सून आधार मिळेल, आणि बाकीचे अर्ध्यास प शक्ति तोलून धरील; परंतु या पक्षीं शक्ति चार तोळ्यांचा ठिकाणीं बारा तोळ्यांची लागेल; कोणतेही वजन फ आणि अ यांचा बरोबर मध्यभागी असल्यास, त्यास तोलून धरण्यास त्याचा निमें वजन प स्थळीं असावें. चार तोळ्यांची प उच्चालकशक्ति तिचा वरील चाका- वरून लागू होत्ये, ह्मणून त्या चाकाचा आंसावर तिचा दुप्पट अथवा आठ तोळ्यांचा भार पडेल; ही गोष्ट कप्पीचें लक्षण सांगत्ये वेळेस दाखवितां येईल ; जर क टैंकूवर किती भार पडतो हें जाणावयाचें असेल, तर २१ वजनांतून ४ शक्ति वजा करावी ह्मणजे बाकी . २० इच्छिलें उत्तर येईल; यावरून असें निघतें कीं, टेंकू आणि चाकाचा आंत यांवरील एकंदर भार २८ आहे, आणि तो, वजन आणि शक्ति यांचा बरोबर आहे.-

 दोन मनुष्यें काठीस ओझें टांगून नेतात हैं या प्रकारचा उच्चालकाचें प्रसिद्ध उदाहरण आहे; जसें नालकी, पालखी अथवा दोन नवघण्ये काठीस ओझें