पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
माहितगारीचे दृष्टांत.

भाकृति ६९.  आंबे मुळ्या इत्यादि पदार्थ चिरायाची विळी या प्रकार- चा उच्चालक आहे, त्यांतील अ सांधा टेंकू आहे, ( ६ ९ आकृतींत पाहा), ब मुठीज. वे वळ शक्ति लावितात, आणि कापण्याचा पदार्थ डतो वजन किंवा प्रतिबंध आहे.

 दरवाजा आपल्या बिजागन्यांवर फिरतो तोही या प्रकारचा उच्चालक आहे. त्यांत दरवाजा है वजन, बिजागरे हा टेंकू, आणि मनुष्य त्यास हातानें लावि - तो किंवा उघडितो तो शक्ति आहे. आणि टेंकूपा- सून शक्ति जितकी लांब असेल, तितके वजन सहज उचलितां येईल असें पूर्वी सांगितलें, ह्मणून मोठा दर- वाजा रीतीप्रमाणे उघडिला असतां, जसा उघडितां येतो, त्याप्रमाणे जर बिजागऱ्याचा अगदी जवळ नेट देऊन उघडायास यत्न केला, तर मोठा श्रम पडेल दरवाजाचा फटींत बोट सांपडलें असतां बळकट चें 'श्वतें, याचे कारण वरचा गोष्टीचा विचार केला अस- तां समजेल; कारण टेकूचा जवळ जो प्रतिबंध अथ- वा वजन ठेविलें असतें त्यावर उच्चालकाचा योगाने दाराचा वेगाघात लागू होतो, आणि त्यामुळे अशी गोष्ट घडले.-

 गलबताचें वल्हें, सुकाण आणि मोडविळी एक- पाताचा अडकित्या हे पदार्थ या जातीचे उच्चा- लक आहेत असें ठरवितां येईल. जेव्हां मनुष्य होडी