पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/११९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जनावरांचे अवयव.

१११

बितो ती शक्ति, आणि फळ्याचा दुसऱ्या टोकास वजन अथवा प्रतिबंध असतो, आणि कारागीर जसा त्वरेने त्या फळ्यावर भार घालितो, त्याप्रमाणे अ, दोरी एका कडीस बांधिलेली असत्ये, तिचा योगाने तें फळें वर होतें.

 जेव्हां उच्चालकाचा लांब बाजूस त्वरेनें पुष्कळ स्थळांतून चालायाचें असतें, तेव्हांच मात्र या उच्चाल- काचा उपयोग करितात, यावरून वजनापेक्षां शक्ति अगत्य अधिक लागये. शिडीचें एक टोंक भिंतीशी टेकून जेव्हां मनुष्य तीस उभी करितो, तें या उच्चा- लकाचे एक उदाहरण आहे. परंतु या जातीचे उ- चालकांचा उपयोग जिवांचा शरिरांत सुंदर रीतीनें दाखविला आहे, शरिरांत अवयवांचा चलनमध्याज- वळ ईश्वराने स्नायूंचा शक्तीची योजना केली आहे ; तिचा योगानें जिवांस आपले अवयव मोठ्या त्वरेनें हल- वितां येतात; आणि त्या स्नायूंत असें सामर्थ्य ठेविलें आहे, कीं जरी अवयवांचा शेवटी मोठमोठी वजने ठेवि- लीं तरी तीं उचलितां येतील. उदाहरण, हातांनी मोठें वजन उचलणें अथवा दांतांनीं कठीण वस्तू फोडणें, ही गोष्ट जनावरांस फार सोपी पडत्ये; अशा सर्व पक्षीं मोठे सामर्थ्याचीच गरज पडत्ये असें नाहीं, परंतु चप- ळता आणि सोपेपणा हीं असली पाहिजेत; या- जविषयीं मनुष्याचा हात हैं उदाहरण घेतो. त्यांत स्नायू खांद्यावरून येऊन, हाताची जसी लांबी असत्ये, त्याप्रमाणे सुमारे त्याचा एक दशांश इतक्या अंतरावर