पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनास प्रतिबंध

राहील. रुपयाची जडता गंजिफेचे घर्षणाहून अधिक आहे ह्मणून अर्भे घडेल.

 स्थिर पदार्थास जर प्रेरणा नकेली तर तो कधीं- ही चलन पावणार नाहीं, हें या वरचे उदाहरणाव- रून सहज कळेल; पदार्थ स्वतः चलन पावत ना- हीं, ह्मणून स्थिर राहणें ही पदार्थाची मूळची स्थिति असा निर्णय करवत नाहीं; कारण, कित्येक उदाहर- णांवरून असेंही समजेल कीं जशी स्थिरता ही पदा- र्थाची स्वाभाविक स्थिति तशीच चलनावस्थाही पदार्थाचे आंगीं मूळापासूनच आहे, आणि बाहेरील प्रतिबंध व प्रेरणा ही दोहों स्थितींस दोन कारणें आ- हेत, हेंही समजेल. चलन टिकण्याचे काळांत घर्षण आणि हवेचा प्रतिबंध यांपासून फार भेद घडतात हेही समजेल.

 जर एकादा गुळगुळीत गोळा भूमीवर लोटला तर, तो जमिनीचे खरखरीतपणामुळे लवकरच थांबेल ; आणि जर तोच तृणाचे सपाट जमीनीवर लोटला, तर त्याचे चलनास पूर्वीपेक्षां थोडा प्रतिबंध, यामुळे तो कांहीं अधिक वेळपर्यंत चालेल; याच रीतीनें बर्फाचे सपाटीवर तो लोटला, तर त्यास घर्षणाचा प्रतिबंध फारच थोडा आणि वायु पाठीवरचा असला, तर तो फारच लांब अंतरावर जाईल. पोलादी आरेचा मोठा भोवरा, वाताकर्षक यंत्राने हवा काढलेले पात्रांत फिर- विला, तर त्यांत हवेचा प्रतिबंध नाहीं ह्मणून तो फार वळे फिरेल. घड्याळाचा लोळा निर्वात जाग्यांत चालू