पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मिश्र उच्चालक.

 एक उच्चालक दुसऱ्यावर लागू, अशा रीतीनें कि- त्येक उच्चालक एकत्र जोडून मिश्र उच्चालक होतो ; लांब उच्चालक करण्यास फार कठीण, ह्मणून जेव्हां मोठ्ये शक्तीची गरज असत्ये, तेव्हां मिश्र उच्चालका- चा उपयोग करितात. बाजूवर मिश्र उच्चालकाची आकृति आहे, ( आकृति ७५) तींत पहिल्ये प्रकारचे

आकृतेि ७५.

 तीन उच्चालक आहेत, आणि ते आपआपल्या टेंकूवर फिरतात. प स्थळी लहानशी शक्ति लाविली असतां, व स्थळींचें मोठें वजन सारितां यावे अथवा तोलून धरि- तां यावे हा या यंत्राचा उद्देश आहे. साध्ये उच्चा- लकाचे फळाची गणना करण्याची जी रीति मागें सांगितली, तीच मिश्र उच्चालकासही लागेल, ह्मणजे, कोणत्येही उच्चालकावरील वजनास टेंकूपासून त्याचे अंतरानें गूण, उच्चालकशक्तीस त्या बिंदूपासून तिचे अंतरानें गुणावें, आणि जर हे दोन्ही गुणाकार बरो- बर येतील, तर वजन आणि शक्ति हीं परस्परांस तोलून धरितील. मिश्र उच्चालकांत जर अनुक्रमानें एक एक