पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
मिश्र उच्चालक.

उच्चालकाचे फळाचा विचार केला, तर उच्चालक शक्तीचें फळ वजनावर कसें लागू होतें, तें दाखवितां येईल. प स्थळींची शक्ति इ स्थळीं ऊर्ध्व दिशेंत प्रेरणा करिये, आणि पफ बाजूस जशी इफ बाजू, त्या- प्रमाणानें इ स्थळींची प्रेरणा प शक्तीस होईल.जर तीनही उच्चालक सारख्या लांबीचे आहेत अशी कल्प- ना केली, ह्मणजे प्रत्येकाची लांब बाजू ८ इंच लांबी- ची, आणि तोकडी बाजू २ इंच लांबीची, तर प स्थळीं एक शेर ठेविला असतां तो इ जवळ ४ शेर तोलून धरील, कारण लांब बाजू ८ इंच आहे, आणि शक्ति एक शेर आहे यामुळे त्यांचा गुणाकार ८ होतो, आणि तोकडी बाजू २ इंच आहे ह्मणून वरचा सा- रिखाच गुणाकार येण्यासाठीं, त्यांस ४ शेरांनीं गुणलें पाहिजे; यावरून दुसऱ्या उच्चालकाचा लांब बाजूस ४ शेरांची शक्ति आहे, आणि त्या बाजूची लांबी पूर्वी प्रमाणे ८ इंच आहे, ह्मणून त्यांचा गुणाकार ३२ येतो, त्या उच्चालकाची तोंकडी बाजू २ इंच आहे, ह्मणून वरचा इतका गुणाकार होण्यासाठीं १६ शेरांचे वजन असावें; यावरून पुनः १६ शेरांची शक्ति तिसऱ्या उ- चालकास लाविली आहे, त्याची लांब बाजू ८ इंच आहे, यावरून गुणाकार १६४८ = १२८ आहे, आणि तोंडी बाजू २ इंच आहे, ह्मणून वरचा इतके उत्तर येण्यासाठीं तीस ६४ यांणीं गुणलें पाहिजे; सारांश प स्थळीं १ शेर टांगिला असतां व स्थळीं ६ ४ शेरांचे 'वजन तोलितां येईल.