पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
मिश्र उच्चालक

प्रकारचे आहेत. पहिल्याने अशी कल्पना करावी कीं, अ ब उच्चालक ५ इंच लांब आहे, जर अ स्थळीं १ शेर असला तर तो व स्थळीं ५ शेरांस तोलील; आणि हा उच्चालक दुसऱ्या क ड उच्चालकाशीं जो- डिला आहे, ह्मणून क स्थळीं ५ शेरांची शक्ति होईल; आणि जर क ड उच्चालकाची लांबी ६ इंच असली, तर क स्थळींची ५ शेरांची शक्ति व स्थळी ३० शे- रांस तोलून धरील, ह्मणजे (५४६ = ३० ). हा दुसरा उच्चालक पूर्वीप्रमाणे तिसऱ्या इफ उच्चालकाशीं जोडि- ला आहे, ह्मणून त्यावर इ स्थळीं ३० शेरांची शक्ति होईल, आणि त्याची लांबी ४ इंच आहे, ह्मणून वर- चा शक्तीनें फ स्थळीं १२० शेरांचे वजन तोलितां येईल; जसें (४×३०=१२० ). पदार्थ वजन करण्याचे यंत्रांत मिश्र उच्चालकाचा उपयोग करितात, आणि दुसरी वजन करण्याची यंत्रे जागा फार अडवितात, ह्मणून तीं जा ठिकाणी नेण्यास अवघड, अशा ठिका णी जर मोठे मोठे पदार्थ वजन करायाचे असतील, तर मात्र यांचा उपयोग करितात. अशा जातीचीं वजन करायाची यंत्रे मुंबईत पुष्कळ ठिकाणी आहेत; त्यांतील एक पैजेचे बंगल्यांत आहे.

प व आकृति ७८. फ फ ड  पहिल्या आणि दुसऱ्या प्रका- रचे असे दोन उच्चालक एका दांडीनें जोडितात, तें बाजूवरील आकृतीत दाखविलें आहे, (आ- कृति ७८) या पक्षीं व शक्तीचा