पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाकडा उच्चालक.

१२१

जून काढिली, तर प वजनांतील तोळे आणि ग क रेघेतील इंच यांचा गुणाकार, आणि व वजनांतील तोळे आणि गफ रेघेंतील इंच यांचा गुणाकार हे दोनही बरोबर होतील.

 तोळे आणि इंच यांखेरीज दुसऱ्या कोणत्याही वज- नाचा आणि अंतराचा जाती घेतां येतील, परंतु वजन आणि शक्ति या दोहोंस सारख्या जाती लावाव्या. वर लिहिलेल्या उदाहरणांपासून असा निश्चय होतो कीं, पदार्थास एका आंसाभोंवतें फिरविण्याचें जें एका- द्या प्रेरणेचें अथवा शक्तीचें सामर्थ्य असतें, त्याची गण- ना, मध्यापासून प्रेरणेचे दिशेस जो लंब होतो, त्या लं- बानें ती प्रेरणा गुणिल्यानें होये. अशा रीतीनें जो गुणाकार येतो, त्यास आंसाभोंवतीं त्या शक्तीचा मोमेंट ह्मणतात; जर कांहीं प्रमाणानें मोमेंट वाढविला किंवा कमी केला, तर पदार्थास आसाभोंवतीं फिरविण्याचें जें प्रेरणेचे सामर्थ्य असतें, तें त्याच प्रमाणाने वाढते किंवा कमी होतें हैं उघड आहे. अथवा जा प्रेरणा किंवा शक्ति पदार्थास एका बाजूनें फिरवितात, त्यांचा मोमें- टांची बेरीज जर, दुसऱ्या प्रेरणा अथवा शक्ति त्या पदार्थास दुसऱ्या बाजूस फिरवितात, त्यांचा मोमेंटांचा बेरिजेपेक्षां अधिक असेल, तर तो पदार्थ पहिल्या प्रे- रणांचा दिशेत फिरेल.

 कोणत्याही सरळ अथवा वांकड्या उच्चालकाची शक्ति आणि वजन यांचें यांत्रिक सामर्थ्य, जा दिशांत