पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
वाकडा उच्चलिकरूप तराजू.

तो विभागिलेल्या गह कौंसावरून फिरतो. जेव्हा क परड्यांत एखादें वजन ठेवावें, तेव्हां त्याचा योगानें तो गोळा कौंसावरून वर चढेल हे उघड आहे. असे असतां जेव्हां तो गोळा परड्यांतील वजनास तोलून धरील अशा ठिकाणी येतो, तेव्हां त्या गोळ्यासमोर कौंसावर जो भाग येतो, तितकें त्या पदार्थाचें वजन आहे असें समजते. प्रत्यक्ष अनुभवावरून, अथवा गणि- तानें कांहीं वजनाची ठिकाणे ठरवितां येतात; तीं त्या कौंसावर मांडिल्यावर फ परड्यांतील पदार्थाचें वजन किती आहे ते ड टोंक कौंसावर दाखवील.

 मागे सांगितलेल्या सर्व उदाहरणांवरून असें लक्षांत येईल कीं उच्चालकाचा आकार कसाही असो, आणि प्रेरणा कशीही तिर्कस लागू झालेली असली, तथापि मनामध्यें प्रेरणेचा दिशेस टेंकूपासून लंब काढून, त्या- वरून गणित केलें असतां, उच्चालकाचा सामर्थ्याचा निर्णय करितां येईल.

 येथपावेतों निरनिराळे जातीचे उच्चालकांचा बि- चार झाला, आतां हा अभ्याय पुरा करण्याचे पूर्वी दोन आधारांवर एक बहाल ठेविलें असतां काय परि णाम होतो याचा विचार करितों.-
अ आकृति ८८. क ब

 जेव्हां एक बहाल, अ, ब, अ- शा दोन टेंकूंवर राहतें, आणि कांहीं वजन त्याचामध्ये कोठे तरी क जवळ टांगिलें असतें, (आकृति ८८), तेव्हां जा तऱ्हेने या वज-