पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
आसास खिळलेले चाक

चा जाडा आणि बारीक भाग यांचा त्रिज्यांचा अंतराने गुणून जो गुणाकार येईल, त्याचे बरोबर आहे.

 मध्यापासून इब पेक्षां ग अधिक लांब आहे, ह्मणून जर त्यास प्रतिबद्धक प्रेरणा फ स्थळी नसती, तर गअ जवळ टांगलेले वजन अधिक झालें असतें; आणि क आणि ग यांचे अंतर, क आणि इ यांचे अंतराजवळ जितके अधिक येत जाईल, त्याप्रमाणे वज- नास तोलून धरण्यास फ स्थळी प्रेरणा कमी लागेल. जर या रचनेस उच्चालक असें मानिलें, तर अर्धवज- नास कग अंतरानें गुणिल्याने क ग बाजूवरील मोमेंट येईल, आणि अर्धवजनास क इ नें गुणिलें असतां, क इ बाजूवरील मोमेंट होईल, आणि हा मोमेंट क ग बाजू- वरील मोमेंटाचा विरुद्ध आहे, क इ बाजूवरील मोमेंटा- पेक्षां क ग बाजूवरील मोमेंट अधिक आहे, ह्मणून त्या दोहोंचा अंतरास प्रतिबद्धक होण्यासाठी फ स्थळीं कांहीं पप्रेरणा असावी. मनांत आण कीं, कग ४ इंच, कइ ३ इंच आणि कफ १० इंच, आणि ड वजन ४०० शेर आहे, यावरून प्रत्येक दोरीवर भार २०० शेरांचा आहे. उच्चालकाचा मूळ कारणाप्र माणें, डचें अर्धवजन २०० शेर आणि क पासून त्या- चें अंतर ४ इंच यांचा गुणाकार ह्मणजे ८००, हा कग बाजूवरील गचा मोमेंट आहे, आणि क इ बाजू- वरील इ चा मोमेंट २००x३ अथवा ६०० आहे; या- वरून त्या दोन मोमेंटांचे अंतर २०० आहे, त्यास फ स्थळींचा शक्तीनें तोलून धरिलें पाहिजे. फ स्थळीं