पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
पाणी काढण्याचा राहाट.

पोहोरा विहिरीचा तोंडाशीं येऊ लागतो, तेव्हां दांडा . फिरविण्यास अधिक कठिण पडतें; कारण कीं, आं- साचा परिघापेक्षां चाकाचा परिघ जितका मोठा असेल, त्याप्रमाणें नफा होईल; ह्मणून एकवार सर्व आसाभोंवतीं दोर गुंडाळिल्यावर, दुसऱ्या वेळेस दोर गुंडाळूं लागला असतां चाकचा परिघं आणि असाचा परिघ यांचे अंतर कमी होत जाते, आणि तेणेंकरून प्रतिक्षणीं दोराचा गुंडाळण्याचा आरंभ न- व्यानें झाल्यावर यंत्राचा नफा कमी होत जातो.

 कधीं कधीं चाकाचा परिघास सारख्या अंतरावर खुंट्या मारिलेल्या असतात ( ८९ आ० पाहा); त्यांस हाताची शक्ति लावितात. शक्तीचा या जातीचा योज- नेचें उदाहरण, मोठ्या गलबताचे सुकाण हलविण्याचें जें चाक असतें, त्यापासून चांगलें दृष्टीस पडतें, या चाकाचा आंत आणि पाणी काढावयाचा हात राहा- टाचा आंस हे दोनही आडवे असतात, आणि मोठ्या गलबतावरील नांगर ओढण्याचा यंत्राचा आंस उभा असतो. त्या यंत्राचा अशा स्थितीपासून जो नफा होतो तो उघड आहे, त्या यंत्राची आकृति ९४ वी आहे. याचा आसाभोंवते सारिख्या अंतरानें कित्येक उच्चालक बसविलेले अस- तात, त्यांतून प्रत्येकास एक किंवा दोन मनुष्य लावून ते त्या उच्चाल- कास वाटोळे फिरवितात; हे दांडे आकृति ९४.