पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संबंधी चलन-वेग-वेगाघात.

गाडी चालती किंवा स्थिर असली तरी, तींतील दुस- या मनुष्याचा संबंधाने त्याचे आंगीं संबंधी स्थि- रता आहे. जेव्हां स्थलांतर झालें असा अर्थ विवक्षित आहे, तेव्हां जा चलनाने ती गोष्ट घडली त्यास स्वतंत्र चलन ह्मणावें. आणि जेव्हां आसपा- सचे पदार्थांचा स्थानाचे फेरफाराने एकादे पदार्थाचा स्थानाचा पालट दिसण्यांत येतो, तेव्हां तो जा चल- नाने झाला त्यास संबंधी चलन ह्मणतात.

 पदार्थाचे चलनाचे त्वरेचे परिमाणास वेग ह्मण- तात. आणि जेव्हां पदार्थाचें चलन सम आहे, तेव्हां त्याचा वेगाचे परिमाण अशा रीतीने काढावें, त्या पदार्थास कांहीं अंतरावर जाण्यास जो काळ ला गेल त्या त्या अंतरास भागावें, भागाकार येईल तें वेगाचे परिमाण झालें. उदाहरण, जर एकादा पदार्थ तीन सेकंदांत तीस फूट चालतो, तर त्याचा वेग दर सेकंदांत दहा फूट आहे.

 समकाळांत समान अंतरावरून जर पदार्थाचें चलन घडतें तर त्यास समचलन ह्मणावें; जर तें चलन अधिकाधिक वाढत जात आहे, तर त्यास वर्ध- मान चलन ह्मणावें; आणि जर कमी होत गेलें तर, त्यास क्षीयमाण चलन ह्मणावें.

 जा शक्तीनें एकादा चलनविशिष्ट पदार्थ दुसऱ्या पदार्थावर आपटतो तीस वेगाघात किंवा चलनसंचय ह्मणतात. आणि तो वेगाघात, पदार्थाचे प्रकृतिपरि- माण अथवा वजन, वेगानें गुणिलें इतक्याबरोबर अस-