पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मिश्रचक्ररूप यंत्र.

१४३

खविलें. यावरून या मिश्र चाकांचा योगानें शक्ति इतकी वाढविली कीं, तिला तिचा वेगानें गुणिलें अस- तां तो गुणाकार, जर वजन आणि त्याचा वेग यांचा गुणाकाराबरोबर होईल, तर ती शक्ति वजनास उच्च- लील. मागील आकृतींत वरचें चाक अ, त्याखालचें संयोगी चक्र ब, दुसरें मोठें चाक क, त्याचा खालचें संयोगी चक्र ड, आणि तिसरें मोठें चाक इ आहे असे मनांत आण. अ चाकाची त्रिज्या १२ इंच ह्मणजे व्यास २४ इंच; आणि त्याचा आंसाची त्रिज्या ४ इंच असें मनांत आण; जर अ चाकाचा परिघास शक्ति लागू केली, तर चाकाचा त्रिज्येस जशी आंसा- ची त्रिज्या, तसा शक्तीचा वेग वजनाचा वेगास होईल. ह्मणजे १२ स ४, अथवा ३ स १. आतां अशी कल्पना करावी कीं, व संयोगी चक्राची त्रिज्या २ इंच आणि त्याचे दांत्ये १२ आणि अ चाकाचे दांत्ये ७२, यावरून त्यांचे प्रमाण १ स ६ असे होईल. पुनः क चाकाचा दांत्यांची संख्या आणि त्याची त्रिज्या अ चाकाप्रमाणेच आहे असें मनांत आण. अ चाकाचा आंसास वजन टांगले आहे असें मनांत आणून, आंसा- चा परिघाचा वेग आणि चाकाचा परिघाचा वेग हे ३ स १ या प्रमाणाने होतील; कारण चाकाची त्रिज्या १२ इंच आणि आंसाची त्रिज्या ४ इंच आहे. जेव्हां अ चाकाचे दांत्ये फिरतात, तेव्हां ते ब संयोगी च- क्राचा दांत्यांवर लागू होऊन त्यांसही आपल्याबरोबर फिरवितात. ह्मणजे वजनास तिप्पट वेगानें फिरवितात.