पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
मिश्रचक्ररूप यंत्र.

व संयोगी चक्र फिरूं लागलें ह्मणजे तें आपल्याबरोबर आपला आंस आणि क चाक यांसही फिरवितें; आणि ६ स १ या प्रमाणाने क चाकाचा त्रिज्येस ब संयोगी चक्राची त्रिज्या आहे, ह्मणून ६ स १, या प्रमाणाने क चाकाचा परिघाचा वेग आणि यामुळे त्यास लावलेल्या शक्तीचा वेग, ब संयोगी चक्राचा वेगास होईल. परंतु वजनापेक्षां व संयोगी चक्र तिप्पट जलद चालतें, झणून क चाकावरचा शक्तीचा वेग ६ पट अधिक असावा; ह्मणजे तो वजनाचा वेगापेक्षां १८ पट अधिक असा- वा. आतां इ चाकावर शक्ति लागू आहे, असें मनांत आण ; आणि अशी कल्पना करितों कीं, ड संयोगी चक्राची त्रिज्या आणि त्याचा दांत्यांची संख्या, ब सं- योगी चक्राप्रमाणेच आहेत, आणि इ चाकाची त्रिज्या क आणि अ चाकांचा त्रिज्यांबरोबरच आहे; क चा- काचे दांत्ये ड संयोगी चक्राचा दांत्यावर लागू होऊन त्यास आपल्याच वेगानें फिरवितात, आणि तेणेंकरून इचाक फिरतें; आणि चाकाचा त्रिज्येस जशी संयो- गी चक्राची त्रिज्या, तसा इ चाकाचा वेग असतो, ह्मणजे या पक्षीं तो वेग ६ स १ असा असतो. वज- नाचा वेगापेक्षां ड संयोगी चक्राचा वेग १८ पट अ धिक आहे असें वर सांगितले, आणि इ चाकाचा प- रिघावरील शक्तीचा वेग, वजनाचा वेगापेक्षां ६ पट अधिक आहे, ह्मणून ड चा वेगापेक्षांही ६ पट अधिक असावा, ह्मणजे ६४१८ यांस १ या प्रमाणानें इ शक्तीचा वेगास वजनाचा वेग असावा,