पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मिश्रचकरूप यंत्र.

१४५

१०८ स १ असा असावा; यावरून शक्तीचें परिमाण १ आहे, आणि तिचा वेग १०८ आहे; आणि वज- नाचे परिमाण १०८ आहे, आणि त्याचा वेग १ आहे; ह्मणून शक्ति आणि वजन यांचे मोमेंटम बरोबर आहेत, यावरून तीं एकमेकास उचलून धरितील.

 दांत्यांचा योगानें एक चाक दुसऱ्या चाकावर लागू होऊन, एका चाकाचें चलन दुसऱ्या चाकास एकसा- रिखें देतां यावें, ह्मणून दांये असे कापिले पाहिजेत कीं, तें एकमेकावरून सहज जातील; दांत्ये करित्येस- मयीं फार लक्ष ठेविलें पाहिजे, नाहीं तर ते एकावर एक घांसून मोडून जातील.

 चाक आणि संयोगीचक्र यांचा योजनेंत, जा चा- काचा योगानें संयोगी चक्र फिरतें, त्यापेक्षां संयोगी चक्राचे फेरे अधिक होतात हे उघड आहे; चाकाशीं जोडिलेले संयोगी चक्राचे फेरे, चाकाचा फेऱ्यांपेक्षां किती अधिक होतात, हें प्रत्येकाचा दांत्यांचा संख्ये- वरून समजते. जसें, चाकाचे दांत्ये १००, आणि संयोगी चक्राचे दांत्ये १० आहेत, तर चाकाचा एक फेरा झाला असतां, संयोगी चक्राचे १० फेरे होतील. यावरून एकत्र चालणारें चाक आणि संयोगी चक्र या परस्परांचा फेऱ्यांचें प्रमाण, त्यांचा दांत्यांचा संख्यांचा उलट्या प्रमाणाबरोबर होईल.

 कधीं कधीं कातड्याची वादी अथवा दोरी यांचा योगाने एका चाकाचे चलन दुसऱ्या चाकास देतात; या युक्तीपासून चाकांस एकमेकापासून हव्या तितक्या