पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
घडियाळचे यंत्र.

१४७

कारण आहे; या अढीचा योगानें चाकाचा चलनाचा दिशेत फेर होतो, इतकेच केवळ नाहीं, परंतु चलन- समयीं पट्टीचा आंगीं ताठपणा येतो.

 घडियाळांतील चाकेँ अशीं आहेत की, त्यांणीं गति उत्पन्न करून तिचा निबंध राखावा, याशिवाय त्यांस वजन उचलण्याचे किंवा प्रतिबंध दूर करण्याचें कांहीं काम नसतें; या चाकांवर लागू होणारी जी शक्ति असत्ये, तिचे सामर्थ्यात फेर पडतो, आणि चाकाची गति तर सर्वकाळ सारिखीच असावी असें असतें. मनांत आण कीं, ती शक्ति तिख्पाचा कमाणीची गुंडाळी आहे, ( आकृति ९८) ती जशी उल- गडत जाते तशी तिची शक्ति- ही कमी होत जाये, यावरून तिचा उलगडण्याचा आरंभी तिचा आंगीं अतिशय सामर्थ्य आकृति ९८. असतें हें उघड आहे. जा तन्हेनें या वस्तूची योजना घ डियाळांत असत्ये ती पुढील आकृतींत आहे; तिजवरून वर सांगितलेल्या दोषाचें निवारण कसें केलें असतें तें दिसेल. ती वाटोळी कमाण गुंडाळून एका पितळेचा ब डबींत बसविलेली अ सत्ये (आकृति ९९), कमाणीचा एक टों- कास जें चौकोनी भोंक असतें त्याचा योगाने ती डबीचा
आकृति ९९.