पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
पवनचक्या.

आकृति १०२.  अशा चक्राचा उपयोग करितात.

 चक्राचा परिघास जीं पात्रें केलीं अस- तात, त्यांत नळ बां- धून आणलेले पाणी प डतें, तेणेकरून तें चक्र फिरतें; आणि जेव्हां हीं भरलेली पात्रे फिरतांना बुं- धाशीं येतात, तेव्हां त्यांतील पाणी बाहेर पडतें, आ णि तीं रिकामी पात्रे दुसऱ्या बाजूनें वर येऊन पुनः भरतात. -

 चलनाचा सातत्यपणाची आणि नियमितपणाची गरज नसत्ये तेव्हां वातप्रेरित चक्रे, ह्मणजे जांस व्यवहारांत पवनचक्क्या असें ह्मणतात त्यांचा उपयोग करितात. या पक्षांत वाराही शक्ति आहे, आणि ती या यंत्रांचा भुजांचा निरनिराळ्या भागांवर लागू होत्ये, यामुळे एका आंसांचा निरनिराळ्या चक्रांवर व्यापार घडतो, असें कल्पिलें पाहिजे, अशा पवन- चवा मुंबईत कित्येक ठिकाणी नव्या झाल्या आहेत.

 जनावरांचा शरिरांचा वजनाने आणि शक्तीनें चक्रांस चलन देतां यावें, याविषयीं पुष्कळ युक्ति का ढिल्या आहेत, त्यांतील एक युक्ति ही पुढील आहे. चाकाचा परिघाशीं घोड्यास उभा करून त्यास चाका- वर चढवितात, तेव्हां त्याचा भाराने चाकाची ती बाजू खालीं येऊन घोडा आपल्या मूळचा स्थितीप्रमाणे