पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
अचरकप्पी.

वारण करण्यासाठी कप्पीची योजना केली आहे, कप्पी • एक वाटोळा लांकडाचा तुकडा असतो, आणि त्याचा किनान्यावर दोरी राहाया जोगी खोल आणि रुंद अशी एक खांच केलेली असत्ये; या वाटोळ्या तुकड्याचा मध्यांतून एक खुंटी मारलेली असत्ये, त्या भोंवतीं तो तुकडा फिरतो, आणि ती खुंटी एका लां- कडाचा घरांत बसविली असत्ये. ही कप्पी आपल्या मध्यांतील खुंटीभोवती फिरव्ये, यामुळे दोरीचें घर्षण बहुतकरून नाहींसें होतें हैं उघड आहे, वाटोळा तु- कडा आणि त्याचें घर ही दोन्ही मिळून जरी कप्पी हें नाव पावलीं आहेत, तरी यांत्रिकस्वार्थ या दोहोंपा- सून होत नाहीं, परंतु दोरीपासून होतो, असें वर सां- गितलें, कारण केवळ घर्षण नाहींसें करण्याकरितां मात्र तुकडा आणि त्याचें घर ही कामांत घेतात. कप्प्या दोन प्रकारचा आहेत; -

 १ अचर कप्प्या, ह्मणजे जा स्थानापासून हलत नाहींत. २ चर कप्प्या, ह्मणजे जा वजनाबरोबर वर येतात आणि खाली जातात.

______
अचर कप्पी.

 जेव्हां १०४ या आकृतीत दाखविल्याप्रमाणें कप्पी अचर असत्ये, तेव्हां दोन सारखी वजने एका दोरी-