पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
चरकप्प्या.

काढ आणि ब क शीं समांतर फइ रेघ काढ; फ ब . रेघेनें दाखविलेले वजनाचे परिमाण, ड ब आणि ब इ रेघांनी दाखविलेल्या प्रेरणांचा बरोबर होईल. दो- रीचा ब क भागावर जितका तणावा असतो, तो बड रेघेत जितके इंच असतात, तितक्या तोळ्यांबरोबर आहे असे जाणावें, आणि याचप्रमाणे दोरीचा ब अ भागावर जितका तणावा आला असतो तो, ब इ रेघेंत जितके इंच असतात, तितक्या तोळ्यांबरोबर आहे असें नाणावें; आणि व वजनानें दोरी सारखी ताणली आहे, ह्मणून बड आणि ब इ बरोबर आहेत, आणि पक दोरीन ओढणारी प शक्ति, ती यांतून प्रत्येका बरोबर असावी.

 कप्प्यांचा संयोग केल्याने त्यांचें यांत्रिक सामर्थ्य अति- शय वाढवितां येईल. कप्प्यांचा संयोगाचा अथवा रचनेचा दोन भिन्न जाति आहेत; एकाप्रकारांत केवळ एक दोर असतो, आणि दुसऱ्यांत अनेक दोर अस- आकृति ११०. तात. बाजूवरील ११० व्या आकृतींत एक दोरी कित्ये- क क अचर कप्प्यांवरून नेली आहे. मनांत आण कीं व रचा अ बाहालास तीन कप्प्या आहेत आणि खा- लचा ब बाहालास ही तीन कप्प्या आहेत; दोरीचे एक टोंक क जवळ बांध, आणि ब बाहलाचा कप्प्यां- चा खालचा बाजूनें तो दोर घेऊन, अ बहालाचा