पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माहितगारीचे दृष्टांत - प्रथम चलननियम.

जितका लहान आहे तितकाच जर त्याचा वेग मोठ्या पदार्थाचा वेगाहून अधिक आहे, तर मोठ्य पदार्थाचे आंगीं जो वेगाघात येईल तितकाच लहा- नाचा आंगींही येईल. बंदुकीचे दारूची कल्पना निघाल्यापासून त्या दारूचा योगानें लहान पदार्था- चा आंगींही मोठा वेग देतां येऊ लागला, यामुळे ते- व्हांपासून लोक युद्धोपयोगी मेषमुखयंत्र उपयोगांत घेत नाहींसे झाले, कारण पांच हजार शेर वजनाचें हें यंत्र जे काम करितें, तेच काम छत्तीस शेर वजनाचा गोळा त्याहून जितक्या वजनांत कमी आहे तितका वेग त्यास दिल्यास तो करील.

_______
अध्याय २.

 सर्व चलनाचे मूळतत्वाचे प्रकार तीन करितां येतात; त्यांस चलनाचे नियम असें ह्मणतात.

प्रथम चलननियम. - पदार्थ जा स्थितीत असतो त्या स्थितीचा पालट प्रेरणारूप कारणानें न झाला, तर तो त्याच स्थितीत राहतो; ह्मणजे, स्थिर पदार्थ स्थिरावस्थेत राहतो, आणि चलन- युक्त पदार्थ सरळ रेत समचलनाने चालतो.

 पदार्थाचा आंगचा जडतेचें जें मागें वर्णन केलें, ती जडता या नियमास आधार आहे, असें शिकणा- रांचा ध्यानांत सहज येईल. आतां प्रेरणेवांचून पदा-