पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चरकण्याचे संयोग.

१६९.


अथवा पहिल्या दोराचा नऊपट तणावा तिसऱ्या दो- रावर आला असतो, आणि याप्रमाणे पुढेही घडतें. आणि शेवटील दोराचा तणाव्याचा तिप्पट वजन असतें. यामुळे प स्थळीं ४ शेर असल्याने व स्थळीं १०८ शेर उचलितां येतील. आकृति १२१. क  बाजूवरील १२१ व्या आ- कृतींत एक कप्प्यांची रचना दाखविली आहे, त्यांत १२० व्या आकृतींत दाखविल्याप्रमाणे दोराचें टोंक शेवटीं एका स्थिरबिंदूस बांधलें असतें तसें नाहीं, परंतु तें वजनास बांधलें आहे. अ आणि ब ह्या दोन चरकप्प्या आहेत, आणि क अचरकप्पी आहे. क अचरक- प्पीवरून एक दोर नेऊन त्याचें एक टोंक व वजनास बांधलें आहे, आणि दुसरें टोंक व चरकप्पीस अडकविलें आहे, पूर्वीप्रमाणें व कप्पीवरून दुसरा एक दोर नेऊन त्याचे एक टोंक वजनास बांधले आहे, आणि दुसन्या टोकास कप्पी बांधली आहे. या पक्षांत वजनास उच- लणारे तीन दोर आहेत; त्यांतून पहिला दोर शक्तीचा सामर्थ्यानें ताणला आहे, दुसरा दोर शक्तीचा साम- र्थ्याचे दुपटीनें ताणला आहे, आणि तिसरा दोर शक्ती- चा सामर्थ्याचा चौपटीनें ताणला आहे. यावरून