पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
प्रथम चलननियम

र्थास चलन प्राप्त होणार नाहीं इतकाच परिणाम केवळ जडतेचा नाहीं, तर पदार्थ एकवार चलन पा- वला असतां, त्यास कोणताही प्रतिबंध न झाल्यास तो चलनावस्थेतच राहतो, हाही परिणाम जडतेचा आहे ; ह्मणूनच पदार्थात एकवेळ चलन दिलें आणि जर हवा, गुरुत्वाकर्षण, आणि घर्षण इत्यादि प्रति- बंधक कारणांनी त्याचे चलनाचा नाश न झाला तर, तो पदार्थ सरळ रेषेत चालेल; जितकीं प्रति- बंधक कारण कमी करावीं तितकें चलन अधिक वेळ टिकेल, याजकरितां वरचीं प्रतिबंधक कारणें अगदीं नाहींशीं केलीं, तर चलन कधींही बंद होणार नाहीं असा निश्चय होतो.

 चलन पावलेला पदार्थ कारणावांचून आपला वेग बदलीत नाहीं, अथवा आपला मार्ग बदलीत नाहीं; ह्मणून मोकळे चलन सरळ आणि सम असे असतें. सरळ चलनाचा अर्थ बंदुकेची गोळी अथवा तीर सरळ वर किंवा खालीं मारिल्याने उघड ध्या- नांत येतो.

 तीर आणि बंदुकेची गोळी, हीं सरळ रेघेंत जा- तात, तसा गोफणगुंडा गोफणींतून सुटल्यावर सरळ रेषेत जातो. वर्तुळांत फिरणारा जो पदार्थ, त्यास त्याचे आंगचे जडतेचा विरुद्ध वर्तावें लागतें, ह्मणून त्याजवर दोन तरी प्रेरणा असाव्या. त्या पदार्थास व- र्तुळांत किंवा वक्र रेषेंत राखणारी जी प्रेरणा तीस मध्याकर्षप्रेरणा ह्मणतात; आणि पदार्थाची जडता,