पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
घर्षणलाटा.

हा नियम एकसारखा लागू होतो. हीच गोष्ट शब्दभे- दानें सांगितली असतां, याप्रमाणे ह्मणतात, कीं कप्प्यां- चा कोणत्याही रचनेत जेव्हां वजन आणि शक्ति हीं परस्परांस तोलून धरितात, तेव्हां शक्ति आणि जा स्थ- ळांतून तिचें गमन घडते, त्यांचा गुणाकार, वजन आणि त्याचे गमनाचें स्थळ यांचा गुणाकार, हे बरोबर होतील. शास्त्ररीतीनें कप्पीपासून जो स्वार्थ होतो असें दिसतें, तो स्वार्थ व्यवहारांत फार कमी होतो, कारण दो-यांचे घर्षण, आणि जा खुंट्यांवर अथवा आंसांवर कप्प्या फिरतात त्यांचे घर्षण, यांसाठीं पुष्क- ळपणीं सूट द्यावी लागये. बहुतेक पक्षांत शक्तीचे नि- कृष्ट तरी दोन तृतीयांश नाहींसे होतात असें ठरविलें आहे. गारनेट साहेबाने घर्षणलाटांची जी युक्ति काढली आहे, तिची योजना केली असतां कप्प्यां- चा कोणत्याही रचनेतील घर्षण फारकरून कमी क रितां येईल.


______