पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उतरण.

१७९

याशी समांतर दिशेत घडेल, तर वजनास उतरणीवर दाबून धरण्याकरितां शक्तीचा कांहीं अंश खचवा लागेल; परंतु जर शक्तीचा व्यापार सपाटीशी समां- तर घडेल, तर सर्व शक्ति वजनास उतरणीवरून वर ओढण्यास लागू होईल; आणि जेव्हां शक्ति उतरणी- चा वर किंवा खालीं लागू होये, तेव्हां अशी गोष्ट घडत नाहीं, कारण तिचा कांहीं अंश मात्र उपयो- गास लागतो.

 एका उतरणीवरील वजनास दुसऱ्या उतरणीवरील वजनानें तोलून धरितात; या पक्षांत जा उतरणीवर ती वजने असतात, त्या उतरणींचा पायांचा प्रमाणानें तीं बजने असतात. १२८ व्या आ- कृतींत दोन उतरणी दाखवि ल्या आहेत, त्यांची उंची सारि खी असून त्यांचे उतारसारखे नाहीत; व आणि प हीं दोन वजनें या उतरणींवर आहेत, अ आकृति १२८. ती एका दोरी बांधून ती दोरी क कप्पीवरून सोडिली आहे. लांब उतरणीची लांबी अ पासून क पर्यंत २ फुटी आणि तोकड्या उतरणीची लांबी व पासून क पर्यंत १ फूट असेल, तर तोकड्या उतरणीवर व स्थळीं ४ शेर ठेविल्यानें लांब उतरणीवर प स्थळीं ८ शेर तो- लून धरितां येतील, आणि याचसारिखें दुसऱ्या को- णत्याही प्रमाणानें घडेल. एकाशीं एक लागलेल्या उ- तरणींवरून ओझीं चढविण्याची ही रीति, मोठमोठ्या